बऱ्याच लोकांना नखं दातांनी कुरतडण्याची सवय असते. कशाचाही विचार न करता बरेच लोक नखं दातांनी कुरतडतात. मग एकतर कुरतडलेली नखं चावत राहतात नाही तर फेकून देतात. असं करण्यास अनेक डॉक्टर मनाई करतात. पण काही लोकांची ही सवय सुटत नाही. असं केल्याने अनेक आजारांचा धोका असतो. पण कुणी ऐकत नाही.
तुम्हालाही नखं खाण्याची सवय असेल तर हा व्हिडीओ पाहिल्यावर कदाचित तुमची सवय मोडेल. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा व्हिडीओ घेऊन आलो आहोत तो बघितल्यावर तुम्ही जेव्हाही नख दातांवर न्याल तुम्हाला उलटी येईल. या व्हिडिओत एका व्यक्तीने दाताने कुरतडलेलं नख मायक्रोस्कोपमधून दाखवलं. यात दिसलं ते हैराण करणारं आहे.
हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, नखांमध्ये अनेक बॅक्टेरिया राहतात. याच कारणाने सगळ्यांना हा सल्ला दिला जातो की, जेवणाआधी हात स्वच्छ धुवावे. असं केलं नाही तर हे बॅक्टेरिया आपल्या पोटात जातात. ज्यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात.
व्हायरल व्हिडिओमध्ये व्यक्तीने कुरतडलेलं नख मायक्रोस्कोप खाली ठेवलं. त्यानंतर नखांमधील चिमट्याने काढली आणि मायक्रोस्कोपच्या लेन्सखाली ठेवली. जेव्हा ते झूम करून पाहिलं तर असं काही दिसलं ज्यामुळे उलटीही येऊ शकते.
लेन्समध्ये दिसलं की, नखामध्ये अनेक बॅक्टेरिया होते. सोबतच अनेक अळ्याही होत्या. या अळ्या खुल्या डोळ्यांनी दिसत नाहीत. जेव्हा आपण नखं आपल्या दातांनी तोडतो तेव्हा हे बॅक्टेरिया आपल्या पोटात जातात. ज्यामुळे अनेक आजार होतात. हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर करण्यात आला आहे. जो लाखो लोकांनी पाहिलाय.