YOUNG LOOK : तरुण दिसायंचय तर लोणी खा !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2017 11:08 AM
लोणीमध्ये भरपूर पोषक तत्त्व असल्याने ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. अन्य ड्राय फ्रूटच्या तुलनेने लोणीमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह आदींचा समावेश आहे
लोणीमध्ये भरपूर पोषक तत्त्व असल्याने ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. अन्य ड्राय फ्रूटच्या तुलनेने लोणीमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह आदींचा समावेश आहे. लोणीचे काय फायदे आहेत याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया.* लोण्यामध्ये अॅँटी-एजिंग आणि अॅँटी -आॅक्सिडेंट गुण असतात जे वाढत्या वयाच्या प्रभावाला कमी करतात. याच्या सेवनाने आपण बºयाच काळापर्यंत तरुण दिसता. सुरकुत्या पडणे आणि केस पांढरे होण्यापासून लोणी संरक्षण करते. * लोण्यामध्ये कॅल्शियम असते जे कंबर, गुडघे आणि सांधेदुखीपासून आराम देते. * लोण्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने त्यामुळे मांसपेशी मजबूत होतात. सोबतच आपल्याला फिटदेखील ठेवते. * लोणी हे ह्रदय आणि किडनीसाठीही फायदेशीर आहे. ते किडनीला मजबूत बनविते आणि रक्ताचे पोषण करण्यात मदत करते. * लोण्यात उच्च मात्रेत फायबर आणि कमी मात्रेत फॅट असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी सहायक आहे. जेव्हाही आपणास हलक्या स्वरूपात भूक लागेल तेव्हा फ्रायड खाण्यापेक्षा लोणी खाऊ शकता. * ज्या लोकांना अन्न पचण्याची समस्या असेल, त्यांच्यासाठी लोणीचे सेवन खूपच फायदेशीर आहे. यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील पचनक्रिया सुदृढ राहते.