हल्ली प्रत्येकजण आपल्या वाढत्या वजनाच्या समस्येने हैराण आहे. खरं तर वाढत्या वजनाची वेगवेगळी कारणं असतात. पण त्यातल्यात्यात जर लक्षात घ्यायचं झालं तर, आपल्या वाढत्या वजनासाठी आपला दिनक्रम आणि काही सवयी जबाबदार असतात. ज्याबाबत आपल्याला काही माहीत नसतं. आपल्यापैकी बऱ्याचजणांना या सवयी असतात, ज्यांमुळे आपलं वजन सतत वाढत असतं आणि त्याबाबत आपल्याला पुसटशी कल्पनाही नसते. वजन वाडल्यामुळे आपलं शरीर लठ्ठ दिसू लागतं, पण त्याचबरोबर शरीर अनेक आजारांच्या जाळ्यातही अडकतं. अशातच वजन वाढणं ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुम्हाला अशा कोणत्या सवयी आहेत. ज्या वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. तुम्ही या सवयी जर वेळीच बदलल्या तर वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच तुम्ही आजारांपासूनही स्वतःचा बचाव करू शकता. जाणून घेऊया वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सवयींबाबत...
वजन वाढवणाऱ्या सवयी :
झोप कमी घेणं
जर तुम्ही झोप पूर्ण करत नसाल तर, तुमची ही सवयदेखील वजन वाढविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. पूर्ण झोप न घेतल्यामुळे शरीरामध्ये वजन वाढवण्याऱ्या हार्मोन्सचा स्तर वाढतो. ज्यामुळे वजन वाढतं. अशातच जवळपास 7 ते 8 तासांसाठी झोपणं गरजेचं असतं.
एक्सरसाइज न करणं
तुम्ही व्यायामापासूनजेवढं लांब पळाल तेवढी तुमच्या आरोग्याची हानी होईल. त्यामुळे दररोज एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. एक्सरसाइज केली नाही तर शरीरातील कॅलरी बर्न होणार नाही आणि फॅट्सचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता
आरोग्य जपण्यासाठी हेल्दी डाएट घेणं अत्यंत आवश्यक असतं. जर तुम्ही आहारामध्ये प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करत नसाल तर, त्यामळेही तुमच्या शरीराचं वजन वाढतं. जेवणामध्ये दूध, दही किंवा अंड्यांचं सेवन अवश्य करा. असं केलं नाही तर, शरीरातील मेटाबॉलिज्म प्रोसेस स्लो होते आणि वजन वाढू लागतं.
टिव्ही पाहताना खाणं
जर तुम्हाला टिव्ही किंवा लॅपटॉपवर काम करताना खाण्याची सवय असेल तर तुमचं वजन वाढू शकतं. आता तुम्ही म्हणाल, टिव्ही पाहण्याचा आणि वजन वाढण्याचा काय संबंधं? तर संबंध आहे. तुम्ही जेव्हा टिव्ही पाहताना काहीही खाता. तव्हा तुम्ही ओव्हर इटिंग करता. तसेच अनेक लोकांना टिव्ही पाहताना जंक फूड खाण्याची सवय असते. यामुळे शरीरातील फॅट्स वाढतात. त्यामुळे जवताना फक्त जेवणाकडेच लक्ष द्या.
पाणी न पिणं
जर तुम्ही दिवसभरामध्ये 3 लीटरपेक्षा कमी पाणी पित असाल तर त्यामुळे तुमचं शरीरातून नको असलेले पदार्थ बाहेर टाकणं कठिण होतं. ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म प्रोसेस स्लो होते आणि तुमचं वजन वाढतं.
नाश्ता स्किप करू नका
जर तुम्ही सकाळच्यावेळी नाश्ता करत नसाल तर त्यामुळ तुमच्या शरीराचं वजन वाढू शकतं. कारण असं न केल्याने शरीराचं मेटाबॉलिजम रेट कमी होतो आणि फॅट बर्न होण्याची प्रोसेस स्लो होते. त्यामुळे सकाळच्यावेळी हेल्दी नाश्ता करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. आपली प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.