दिवसभर थकल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता, त्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त थकलेले असतात तुमचे पाय. पण अनेकदा पायांमध्ये एवढा थकवा वाढतो की, सकाळी उठल्यानंतरही पायांच्या स्नायूंमध्ये वेदना जाणवत असतात. यामागील कारण फक्त ओवरबर्डन असल्यानेच नाहीतर तुमच्या अशा काही सवयी आहेत. ज्या पायांचा थकवा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्या पायांचा थकवा वाढविण्यासाठी कारण ठरतात. तसेच पायांचा थकवा दूर करण्यासाठी काही उपाय...
पायांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं...
संपूर्ण शरीरामध्ये अस्तित्त्वात असलेल्या मसल्स 25 टक्के आपल्या पायांचा भाग असतात. जर तुम्ही तुमच्या पायांची काळजी घेत नसाल तर त्यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचू शकतं. तसेच तुम्हाला अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पण तुमच्या काही अशा सवयी आहेत. ज्या पायांसाठी फायदेशीर न ठरता पायांच्या समस्या वाढविण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
पायांचं दुखणं वाढविणाऱ्या चुका...
वाढलेलं वजन
तुमच्या पायांच्या समस्या वाढविण्यासाठी हे सर्वात मोठं कारण ठरतं. वयाची तीशी पार केल्यानंतर जास्तीत जास्त लोक आपल्या वजनाकडे दुर्लक्षं करतात. आपल्या वजनानुसार, ते आपली स्टाइल आणि वॉर्डरोब बदलतात पण याकडे ते दुर्लक्षं करतात की, वाढलेल्या वजनामुळे पायांना किती त्रास सहन करावा लागतो. तुमचं संपूर्ण वजनाचा भार तुमच्या पायांवर असतो. त्यामुळे पाय थकतात आणि त्यांना वेदनाही होतात. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य ते उपाय करणं आवश्यक असतं.
चुकीचे फुटवेअर्स वापरणं
स्टायलिश दिसण्यासाठी आपण वेगवेगळे फुटवेअर्स वापरतो. पण पायांना त्यांना कंम्फर्टेबल असतील अशा फुटवेअर्सची गरज असते. हाय हिल्स, पेन्सिल हिल्स वेअर केल्यामुळे पायांच्या स्नायूंवर प्रेशर येतं. परिणामी वेदना होऊ लागतात. तसेच पायांना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे पायांसाठी सपोर्टिव, आरामदायक फुटवेअर्स वेअर करणं अत्यंत आवश्यक असतं.
जास्त चालणं किंवा एक्सरसाइज
वजन कमी करण्यासाठी जास्त वर्कआउट किंवा चालल्यामुळे पायांना त्रास होतो. त्यांना व्यायाम, सक्रियतेसोबतच आरामाचीही गरज असते. पण अशातच पायांना आऱाम देण्यासाठी मध्ये ब्रेक घेणं किंवा वर्कआउट टाइम कमी करणं अत्यंत आवश्यक असतं.
अनवाणी पायांनी फिरू नका
जर तुम्ही घरामध्ये आहात आणि अनवाणी पायांनी फिरत असाल तर यामुळे तुमच्या पायांची समस्या वाढू शकते. खरं तर गवतामध्ये अनवाणी पायांनी चालणं ही पायांचं आरोग्य राखण्यासाठी एक थेरपी आहे. पण टाइल्सवर अनवाणी चालणं तुमच्या पायांना नुकसान पोहोचवू शकतं. त्यामुळे अनेकदा पायांच्या पेशी कमकुवत होतात. त्यामुळे उत्तम असेल की, दिवसभरामध्ये अनवाणी पायांनी घरात फिरण्याऐवजी पायांना आराम देणारे फुटवेअर्स वापरा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.