- मयूर पठाडेतुमच्याकडे घड्याळ आहे? करता त्याचा तुम्ही वापर? तुम्ह्ी म्हणाल, हा काय प्रश्न झाला? घड्याळाशिवाय आमचंच काय, कोणाचंच पान हलत नाही. बरोबर आहे, पण त्या घड्याळाविषयी नाही सांगत मी. रिस्टवॉच, वॉलकॉक, चोवीस तास आपल्या हातात आणि हाताशी असलेल्या मोबाइलमध्ये असलेलं घड्याळ, आपला कॉम्प्यूटर, लॅपटॉपमधलं घड्याळ.. अशी कितीही घड्याळं आपल्याजवळ असली, तरीही आणखी एक घड्याळ कायम, चोवीस तास आपल्यासोबत असतं आणि या सगळ्या इतर घड्याळांपेक्षा तेच अधिक महत्त्वाचं असतं. आपलं सारं आयुष्यच या घड्याळाप्रमाणे चालतं, पण त्याकडेच आपण सर्वाधिक दुर्लक्ष करतो.कोणतं आहे हे घड्याळ. हे घड्याळ म्हणजेच आपलं बॉडी क्लॉक. प्रत्येक गोष्टीची सूचना ते आपल्याला देत असतं. म्हणजे बघा, बºयाचदा आपण प्रवासाला जातो, विमान प्रवास करतो किंवा दुसºया देशांत जातो, तेव्हा आपलं बॉडीक्लॉक बिघडतं. जेट लॅगचाही त्रास आपल्याला होतो, पण आपल्याला हे तेव्हाच कळतं किंवा आपण त्याकडे थोडंफार लक्ष देतो, जेव्हा आपल्याला काहीतरी त्रास होतो. खरंतर असा त्रास झाला, तरी बिघडलेल्या बॉडीक्लॉकचा हा त्रास आहे, हे आपल्याला कळतच नाही.पण शास्त्र सांगतं, या बॉडीक्लॉकवरच तुमचं आयुष्य कसं आहे ते ठरतं. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. निरीक्षण केलंत, तर तुमच्या लक्षात येईल, काही जणांना अगदी ठराविक वेळेला जाग येते, ठराविक वेळेला बरोब्बर झोप येते. अनेकांना तर बेल लावलेली नसली तरीही ठराविक वेळेला जाग येते म्हणजे येतेच. हे आहे आपलं बॉडीक्लॉक. ते जर व्यवस्थित चालायचं असेल, तर आपल्या शरीरालाही थोडी शिस्त लावा. वेळच्या वेळी झोपणं, उठणं या गोष्टी जरी नियमितपणे केल्यात तरी हे बॉडी क्लॉक व्यवस्थित काम करायला लागेल. नैसर्गिकपणे जगणं हे जास्त महत्त्वाचं. दिवसा जास्तीत जास्त सूर्यप्रकाशात राहाणं, सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ सूर्यप्रकाशात जाणं, घरात हा सूर्यप्रकाश शिरू देणं, रात्र झाली की झोपणं.. या यातल्या अत्यंत बेसिक गोष्टी. ते तुमचं आयुष्य नुसतं वाढवणारच नाही, तर तुम्हाला आनंदी आणि उत्साहीदेखील करेल..
तुमचं बॉडीक्लॉक लावील तुमच्या आयुष्याला चारचॉँद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 6:09 PM
बिघडलेलं बॉडीक्लॉक आणा जागेवर आणि बघा चमत्कार..
ठळक मुद्देबॉडीक्लॉकवरच तुमचं आयुष्य कसं आहे ते ठरतं.आपलं बॉडीक्लॉक जर व्यवस्थित चालायचं असेल, तर आपल्या शरीरालाही थोडी शिस्त लावा.वेळच्या वेळी झोपणं, उठणं या गोष्टी जरी नियमितपणे केल्यात तरी हे बॉडीक्लॉक व्यवस्थित काम करायला लागेल.