- मयूर पठाडेझोपेच्या प्रामुख्याने दोन समस्या असतात. एक म्हणजे काही जणांना रात्रीची झोपच येत नाही. त्याला निद्रानाश म्हणतात. दुसरी समस्या म्हणजे झोपल्यानंतर श्वासमार्गात अडचणी निर्माण होणे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित श्वास घेता येत नाही. त्यामुळे साहजिकच तुम्हाला व्यवस्थित झोप लागत नाही आणि रात्री झोपल्यानंतर बºयाचदा तुम्हाला झोपेतून उठावं लागतं. झोपेच्या संदर्भात अनेकांच्या या तक्रारी असतात. सुरुवातीला क्षुल्लक वाटल्या तरी नंतर त्या गंभीर स्वरुप धारण करतात आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांनाही तुम्हाला तोंड द्यावं लागतं.अनेकदा तर या व्याधींचं दीर्घ आजारात रुपांतर होतं आणि त्यावरचे उपायही मग कठीण होत जातात. त्यामुळे तुमच्या निरोगी आयुष्य जगण्याच्या इच्छेवर आणि तुमच्या जगण्यावरही त्याचा विपरित परिणाम होत जातो.यासंदर्भात ‘अमेरिकन अकॅडेमी आॅफ स्लीप मेडिसीन’ (एएएसएम) या संस्थेनं दीर्घ संशोधन केलं आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम. सफवान बदर यांचं तर स्पष्ट म्हणणं आहे, की तुमच्या जुनाट आजारांना तुमची झोप हीच मुख्यत: कारणीभूत असू शकते आणि तुम्हाला कुठला जुनाट, चिवट आजार असेल तर आधी तुमच्या झोपेकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यावर आधी उपचार केले पाहिजेत. त्यानंतर तुमच्या जुनाट आजाराचं निदानही झटपट होऊ शकतं.त्यामुळे झोपेच्या तक्रारींनी तुम्ही हैराण असाल तर त्याकडे आधी तातडीनं लक्ष दिलं पाहिजे आणि काही जुनाट आजारांनी तुमचं जिणं हैराण केलं असेल, तर आधी तुम्हाला व्यवस्थित झोप मिळते आहे की नाही याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे.तसं केलं तर निरोगी आयुष्य जगण्यास तुम्हाला चांगलीच मदत होईल.
तुमच्या जुनाट आजारांचं मूळ ‘क्षुल्लक’ कारणात असू शकतं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:59 PM
त्याकडे लक्ष दिलं तर होईल तुमचं आयुष्य सुकर..
ठळक मुद्देतुमच्या जुनाट आजारांना तुमची झोप हीच मुख्यत: कारणीभूत असू शकते.तुम्हाला कुठला जुनाट, चिवट आजार असेल तर आधी तुमच्या झोपेकडे लक्ष दिलं पाहिजे.त्यानंतर तुमच्या जुनाट आजाराचं निदानही झटपट होऊ शकतं.