तुम्ही काय खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केल्यास तुमचं आरोग्यही चांगलं राहील. चुकीच्या आहारामुळं जीव धोक्यात येऊ शकतो. मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार, एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, आहाराचा थेट संबंध आतड्यांमध्ये आढळणाऱ्या सूक्ष्मजंतू आणि प्रोस्टेट कर्करोगाशी (कॅन्सर) आहे. हे संशोधन कॅन्सर एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालं आहे. संशोधकांनी १.४८ लाख लोकांच्या माहितीचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे.
यामध्ये प्रोस्टेट कर्करोगावर उपचार घेतलेल्या ७६ हजार ६८५ पुरुषांच्या आरोग्याचे विश्लेषण केलं गेलं. या लोकांचे वय ५५ ते ७४ दरम्यान होतं. संशोधकांनी या लोकांच्या १३ वर्षांच्या वैद्यकीय नोंदींचाही माहिती घेतली. यानंतर विशेष अभ्यासासाठी ७०० पुरुषांची निवड करण्यात आली. त्यापैकी १७३ लोकांचा मृत्यू प्रोस्टेट कर्करोगानं झाला. विश्लेषणानंतर असं आढळून आलं की, ज्या लोकांच्या आहारात मांस आणि प्राणीजन्य पदार्थांचा अधिक समावेश होता, त्या लोकांच्या आतड्यातील जीवाणूंनी त्यांच्यापासून मुक्त झालेल्या अणूंचे प्राणघातक अणूंमध्ये रूपांतर केलं, ज्यामुळं त्यांना प्रोस्टेट कर्करोग (Change in diet reduce risk of cancer) झाला.
संशोधकांना असे आढळून आले की, ज्या लोकांच्या रक्ताच्या सीरममध्ये फेनिलासेटिलग्लुटामाइनचे प्रमाण जास्त होते, त्यांच्यामध्ये इतर लोकांपेक्षा प्रोस्टेट कर्करोगाने मृत्यू होण्याचं प्रमाणा २.५ टक्के जास्त होतं. याव्यतिरिक्त, ज्या पुरुषांमध्ये कोलीन आणि बेटेनचे प्रमाण जास्त होते त्यांना प्राणघातक प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता दुप्पट होती. डॉ शरीफी यांनी सांगितले की, आपण जे खातो, आतड्यात असलेले बॅक्टेरिया त्यात बदल घडवून आणतात. हे कोलीन आणि बेटेन सारख्या अणूंचे प्राणघातक अणूंमध्ये रूपांतर करतात.
त्यामुळे आहारात बदल करून प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करता येतो. डॉ शरीफी यांनी स्पष्ट केले की चयापचयासाठी आवश्यक असलेले अणू जे घातक प्रोस्टेट कर्करोगाच्या परिवर्तनास जबाबदार असतात ते सहसा मांस आणि प्राण्यांच्या उत्पादनांमधून येतात. त्यामुळं कमीत-कमी किंवा मर्यादित स्वरूपात मांस आणि प्राणीजन्य पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरेल. मात्र, प्रोफेसर स्पेक्टर म्हणाले की, या सर्व गोष्टी हा लोकांचा कायमचा आहार बनल्या आहेत, त्यामुळे तो सहजासहजी बंद करणं अवघड काम आहे.
जेनिटोरिनरी मॅलिग्नॅन्सी रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. निमा शरीफी यांनी सांगितले की, काही पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर विशेष आहारामुळे तयार झालेल्या अणूंमुळे वेगाने वाढतो. संशोधकांना असं आढळून आलं की चयापचय प्रक्रियेत सहभागी असलेले तीन अणू, फेनिलासेटिलग्लुटामाइन, कोलीन आणि बेटेन (फेनिलासेटिलग्लुटामाइन, कोलीन आणि बेटेन), थेट प्रोस्टेट कर्करोगाशी संबंधित आहेत. जेव्हा आतड्यात आढळणारे बॅक्टेरिया फेनिलॅलानिनचे विघटन करतात तेव्हा फेनिलॅसेटिलग्लुटामाइन तयार होते. काही पदार्थांमध्ये समान कोलीन आणि बेटेन आढळतात. दूध पदार्थ, मांस, चिकन, सोया, मासे, सोयाबीन, बीन्स, आणि सोड्यामध्ये आढळणारे फेनिलॅलानिनमध्ये उच्च पातळीचे प्रथिने आहेत. ही प्रथिनं शरीरासाठी आवश्यक आहे. पण, जीवाणू या अणूंचे कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या घातक अणूंमध्ये रूपांतर करतात.