शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

तुमचा मोबाइलच तुमच्या मूळावर उठलाय! खोटं वाटतं? हे वाचा...

By admin | Published: June 16, 2017 1:44 PM

मोबाइल फोन वापरताना आपण बिंधास्त असतो, पण त्याचे दुष्परिणाम मात्र भयंकर.

- नितांत महाजनइज युवर सेलफोन मेकिंग यू लेस पॉप्युलर? असा प्रश्न जगभरातल्या फोन वापरकर्त्यांना विचारला तरी त्याचं उत्तर ते नाही असंच देणार आहेत. देतातही. पण ते खरं नाही. म्हणजे आपला फोनच आपला वैरी झालाय हे आपण मान्यही करणार नाही. मात्र आपल्या नकळत तसं घडतं आहे. आणि आपल्या करिअरच्याच नाही तर आपल्या जगण्याच्याच मूळावर उठलाय हे आपल्याला कळतच नाही. मात्र आपण त्याच त्या चूका परत करत राहतो, लोक आपल्याला हसतात. नाकं मुरडतात. हळूहळू टाळूही लागतात. टीका करतात आणि आपल्या कामावर यासाऱ्याचा मोठा परिणाम होतो. वाईट हेच की हे सारं असं घडतं आहे हे आपल्याला माहितीच नसतं. आपल्या चुकून कधी लक्षातही येत नाही. मात्र या काही गोष्टी पहा. आपण हमखास करतो आणि टीकेचे धनी होतो.१) आपला फोन कुठंही वाजतो. कुठंही म्हणजे काहीजण तर आपला सेलफोन टॉयलेटमध्येही घेऊन जातात. तिथं तर तो वाजतोच, रात्री बेरात्री, थिएटरमध्ये, हॉस्पिटलध्ये, मिटिंगमध्ये, एवढंच कशाला बॉस आपल्याला झापत असताना त्याच्या केबिनमध्येही वाजतो. तसं तो वाजत असेल तर समजा, आपलं काही खरं नाही.२) मोठमोठ्यानं बोलता तुम्ही फोनवर. इतक्या मोठ्यानं की बाकीच्यांना काम करणं अवघड होतं. इतकं अवघड होतं की तुमच्या आवाजापलिकडे काहीच घडू शकत नाही. त्यात बोलणंही अनेकदा पर्सनल. अगदी चमत्कारिक तपशिल लोकांना ऐकू जातात. आणि मग लोक त्यावर हसतात. कायमच.

 

३) ढिंकचिका ढिंकचिका पासून कोकिळेचे आवाज, कुत्र्याचे आवाज, एखादी तुतारी, लहान बाळाच्या रडण्याचा आवाज अशी जर तुमची रिंगटोन असेल तर कुणी का तुम्हाला सिरीयस्ली घ्यावं? त्यात तो फोन वाजतच असतो, आणि तुम्ही फिरता आॅफिसभर. किंवा मॉलमध्ये तुमच्या खिशातला फोन असा विचित्र वाजतो. आणि हसू होतंच तुमचं.४) अ‍ॅँ?? ऐकू येत नाही? कायऽऽऽ? असं सारं जर तुम्ही ओरडून बोलत असाल तर आवरा स्वत:ला?५) आॅफिशियल मिटिंगमध्ये फोन चेक करता, व्हॉट्सअ‍ॅपचवरचे जोक पाहून हसता, मेल चेक करता, कुणी तुमच्याशी बोलत असताना तुमचंं नाक फोनमध्ये असतं? लोक टाळतीलच तुम्हाला हमखास.६) तुम्ही आॅफिसची मिटिंग म्हणून, किंवा मित्रांबरोबर बाहेर जेवायला जाता, आणि फोन टेबलवरच ठेवता? सारखा वाजला का वाजला का करुन पाहता, मग समजा की तुम्हाला मॅनर्स जरा कमीच आहेत.