झोप आपल्या शरीराची एनर्जी कायम ठेवण्यासाठी फार गरजेची असते. पुरेशी झोप न घेतल्याने डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि जाडेपणा या समस्या होताना दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुमच्या झोपण्याच्या सवयीवरून तुमच्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात.
झोपेदरम्यान श्वास घेण्यास अडचण
जर तुम्हाला झोपेदरम्यान श्वास घेण्यास सतत अडचण होत असेल तर हा स्लीप ऐप्नियाचा संकेत असू शकतो. सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये झोपेशी संबंधित आजारा स्लीप ऐप्निया वाढत आहे. आणि याची सर्वात मोठं कारण दिनचर्या नियमित न होऊ शकणे हे आहे. तज्ज्ञांनुसार, जितकं शक्य असेल तितक्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि झोपण्याची सवय नियमित करा. झोप पूर्ण होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेत राहणं गरजेचं आहे. झोप पुरेशी न झाल्याने होणारी समस्या स्लीप ऐप्निया ही आहे. यात श्वास घेण्यास त्रास होतो.
पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाणे
जर रात्री तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागत असेल तर हा डायबिटीजचा संकेत असू शकतो. रात्री दोनपेक्षा अधिक वेळा लघवीला जावं लागणे डायबिटीज किंवा प्री-डायबिटीजचा संकेत असू शकतो. सतत लघवी लागत असल्याने ब्लडमधील शुगरचं प्रमाण वाढू लागतं. जेव्हा ब्लडमध्ये शुगर वाढतं तेव्हा शरीर लघवीच्या माध्यमातून ते बाहेर काढतं.
सतत कूस बदलणे आणि हृदयाचे ठोके वाढणे
जर रात्री झोपेत तुम्ही पुन्हा पुन्हा कुस बदलत असाल आणि हृदयाचे ठोके वाढत असतील तर हे ओवरअॅक्टिव थायरॉइडचं कारण होऊ शकतं. जर रात्री तुम्हाला झोपताना चांगली झोप न लागणं, हृदयाचे ठोके वाढत असतील आणि अस्वस्थ वाटत असेल तर हे हायपरथायरॉडिज्मचं कारण असू शकतं.
अचानक झोप उघडणे
झोपलेले असताना अचानक जाग येणे आणि पुन्हा झोप न येण्यामागे रेस्टलेस लेग सिंड्रोम(मस्तिष्क संबंधी विकार) असू शकतो. या आजाराने जवळपास ३ टक्के लोकसंख्या प्रभावित आहे. जर तुम्हाला रात्री जोडीदाराला लाथ मारण्याची किंवा झोपेतून उठून बसण्याची सवय असेल तर हा रेस्टलेस लेग सिंड्रोम असू शकतो.
झोपण्याची कोणती पोजिशन चांगली?
आयुर्वेदानुसार, लेफ्ट साइडला म्हणजे डाव्या कुशीवर झोपणे बेस्ट स्लीपिंग पोजिशन आहे. चला जाणून घेऊ याचे फायदे....
हृदय राहणार निरोगी
आपलं हृदय हे डाव्या बाजूला असतं आणि जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो, तेव्हा ग्रॅव्हिटीमुळे हृदयला फायदा होतो. म्हणजे तुम्ही झोपलेला असाल तेव्हा हृदयावर काम करण्याचं ओझं कमी होतं. त्यामुळे हृदय अधिक चांगल्याप्रकारे काम करतं आणि निरोगी राहतं.
पचनक्रिया मजबूत होते
जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा ग्रॅव्हिटीच्या मदतीने शरीरातील वेस्ट सहजपणे छोट्या आतड्यांमधून मोठ्या आतड्यांमध्ये पोहोचतं. आणि जेव्हा तुम्ही सकाळी झोपून उठता तेव्हा तुम्हाला फ्रेश होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यामुळे शरीराची पचनक्रिया मजबूत होते.
घोरण्यापासून सुटका
तुम्हाला भलेही यावर विश्वास नसेल पण हे खरं आहे की, डाव्या कुशीवर झोपल्यास तुमची घोरण्याची सवयही कमी होते. किंवा असही होऊ शकतं की, तुमचं घोरणं बंद व्हावं. याचं कारण हे आहे की, डाव्या कुशीवर झोपल्याने जीभ आणि कंठ दोन्ही न्यूट्रल पोजिशनमध्ये असतात. ज्यामुळे आपले एअरवेज क्लिअर असतात आणि आपण सहजपणे मोकळा श्वास घेऊ शकतो.