प्रत्येक व्यक्तीला काही अशा सवयी असतात ज्या ते इच्छा असूनही बदलू शकत नाही. पण तुमच्या या काही सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. अशाच काही सवयींबाबत आम्ही सांगणार आहोत, ज्या तुम्ही वेळीच बदलल्या तर तुमचा फायदा होईल.
ईमेल - ऑफिसमधून घरी आल्यावरही अनेकजण कामाचे ईमेल चेक करत बसतात. काही लोक झोपताना मेसेज आणि ईमेक चेक करतात. पण या सवयीमुळे स्ट्रेस आणि ब्लडप्रेशर वाढू शकतं. इतकेच नाही तर तुमच्या या सवयीमुळे तुमच्या पार्टनरलाही स्ट्रेस येऊ शकतो.
हॅंड ड्रायर - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, पब्लिक टॉयलेट्समध्ये हॅंड ड्रायर वापरल्याने हातावर अधिक जास्त बॅक्टेरिया येतात. टॉयलेटमधील हॅंड ड्रायरमध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि त्याखाली हात कोरडे करण्यादरम्यान ते तुमच्या हातावर येतात.
ब्रेड - काही लोकांना एकदम कुरकुरीत ब्रेड खाणे पसंत असतं. काह रिसर्चनुसार, फार जास्त कुरकुरीत किंवा जळालेला ब्रेड खाल्ल्याने एक्रीलॅमिड नावाचा हार्मोन रिलीज होतो, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
सलाद - अनेकजण सलाद धुवून खात नाहीत. सलाद धुवून न खाल्ल्याने शरीरात अनेकप्रकारचे बॅक्टेरिया जातात. २०१६ मध्ये एका रिसर्चमध्ये आढळलं होतं की, हे बॅक्टेरिया जीवघेणेही असू शकतात.
गरम चहा - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, फार गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने फूड पाईप संबधित कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. सोबतच याने त्वचेच्या पेशींचही नुकसान होण्याचा धोका वाढतो.
सनस्क्रीन - अनेकदा काही लोक उन्हात जाण्यापूर्वी चेहरा आणि त्वचेवर सनस्क्रीन लावतात. काही लोक असं रोज करतात, पण त्यामुळे त्यांना व्हिटॅमिन डी मिळत नाही. अशात ऑस्टियोपोरोसिस आणि हार्डसंबंधी आजार होण्याचा धोका वाढतो.