काय नोकरीला लागल्यापासून एकदम गुटगुटीत बाळ झालं तुझं. नोकरी मानवलेली दिसते. असं सगळे म्हणतात. पण आपल्याला माहिती असतं हे खरं नाही. पोटाचा भोपळा होतोय. वजन वाढतंय. अॅसिडीटी छळतेय. व्यायाम नाहीच. त्यामुळे तब्येतीची वाट लागतेच. पण हे सगळं का होतंय, फक्त बैठय़ा कामानं नव्हे तर आपल्या ऑफिसचं वातावरणही त्याला जबाबदार आहे. ते वातावरण बदलता नाही आलं तरी आपण त्या वातावरणात स्वतर्कडे लक्ष तर देऊच शकतो.
1) अनेक ऑफिसमध्ये हे कल्चरच दिसतं की प्रत्येकजण सतत काही ना काही खातच असतो. सतत खातो. सतत ऑडरी दिल्या जातात. येतात. खातात. स्नॅक, सॅडवीच, पिझे, कोल्ड्रिंक, चहाकॉफी सगळंच. त्यातून आपण किती खातोय याचं अनेकांना भानच उरत नाही. परिणाम, वजन वाढतंच.2) अनेकजण तसे हेल्थ कॉन्शस असतात. घरुन डबा आणतात. पण चार ते सहा या वेळेत भूक लागते. काहीतरी खायचं असतं. मग भेळ, वडे, असं काहीबाही खातात. रोज. ते टाळता येइल का?3) अभ्यास असं सांगतात की ऑफिसमध्ये जर अंधारं वातावरण असेल. डीमलाइट असेल, सूर्यप्रकाशच येत नसेल तर या वातावरणात सतत काही ना काही खावंसं, प्यावंसं वाटतं. आपल्या ऑफिसमध्ये तसं वातावरण असेल तर या खाण्याकडे लक्ष ठेवायला हवं. जरा प्रकाशात चक्कर मारुन यायला हवी.
4) ज्यांच्या कामाच्या वेळा, शिफ्ट, जेवणाच्या वेळा सतत बदलतात त्यांचंही वजन झपाटय़ानं वाढतं.
5) स्ट्रेस आला तरी अनेकजण काम करताना वेफर्स खातात, बिस्टिकं, चिप्स, खारे शेंगदाणे, शेव खातात. त्यानंही वजन वाढू लागतं. त्याला स्ट्रेस इटिंग म्हणतात.
6) अनेकजण काम करता करता जेवताता, खातात, आपण किती खातोय याकडे त्यांचं लक्षच नसतं. बसून राहिल्यानं वजन वाढतच जातं