पत्नी व मुलीच्या धाडसाने वाचले तरुणाचे प्राण बिबट्याचा हल्ला : आरडा ओरड व हुसकावून लावल्याने काढला बिबट्याने पळ
By admin | Published: June 25, 2016 11:03 PM
जळगाव : शेतात काम करीत असलेल्या साईिसंग बारकू पावरा (३५, रा. मालापूर, ता. चोपडा) या तरुण शेतकर्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतर तेथे जवळच असलेल्या या शेतकर्याची पत्नी सुनीता व ११ वर्षीय मुलगी शिमला यांनी मोठे धाडस दाखवित या तरुणाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.
जळगाव : शेतात काम करीत असलेल्या साईिसंग बारकू पावरा (३५, रा. मालापूर, ता. चोपडा) या तरुण शेतकर्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतर तेथे जवळच असलेल्या या शेतकर्याची पत्नी सुनीता व ११ वर्षीय मुलगी शिमला यांनी मोठे धाडस दाखवित या तरुणाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. चोपडा तालुक्यातील मालापूर नजीकच्या डोंगरपायथ्याशी असलेल्या आपल्या शेतात साईिसंग हा त्याची पत्नी व मुलीसह काम करीत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने साईिसंगवर झडप घेत जोरदार हल्ला केला. त्या ठिकाणाहून चार ते पाच फुटावरच त्याची पत्नी व मुलगीही काम करीत होते. हल्ला झाला असताना जवळपास कोणीही नाही, त्यामुळे काय करावे हे समजत नसल्याने क्षणाचाही विलंब न करता पत्नी सुनीता व मुलगी शिमला यांनी पुढे सरसावत मोठ्या धाडसाने या बिबट्याला आरडाओरड करून व त्याच्या दिशेने चालत जाऊन त्याला हुसकावून लावले. एवढ्या वेळात मात्र बिबट्याने साईिसंगच्या चेहर्यावर, हात, पोटावर हल्ला करीत गळ्याचा घोट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच पत्नी व मुलीने धाडस दाखविल्याने साईिसंगची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. तरीदेखील त्याच्या गळ्याजवळ जखम झाली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार....घटनेनंतर पत्नी व मुलगी त्याला शेतातून घरी आणत होते. त्यावेळी जवळच एक दुचाकीस्वार भेटल्याने दुचाकीवर त्याला मालापूर येथे घरी नेण्यात आले व तेथून चोपडा येथे हलविण्यात आले. मात्र हल्ला गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार या शेतकर्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. बिबट्याने तरुणाच्या चेहर्यावर एवढा जबर चावा घेतला आहे की, चेहर्यावर पी बांधूनही रक्त वाहणे सुरूच होते.