- मयूर पठाडेवाढत्या वयाची जाणीव आपल्याला केव्हा होते? विशेषत: तरुणी आणि स्त्रिया तर आपलं वय लपवण्यासाठी किंवा आहे त्यापेक्षा तरुण दिसण्यासाठी काय काय करीत असतात! चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागल्यावर मात्र अनेकांची; त्यातही अनेकीचंी ततफफ व्हायला लागते. आपण आता ‘म्हातारे’ झालोत ही जाणीव त्यांना पोखरायला लागते अणि आपल्या चेहºयाच्या सौंदर्यासाठी महिला अधिकाधिक लक्ष द्यायला लागतात. जो कोणी जे काही सांगेल किंवा जिथे कुठे जे काही वाचायला मिळेल, यू ट्यूबवर पाहायला मिळेल, त्याचा प्रयोग महिला स्वत:च्या चेहऱ्यावर करायला लागतात.काही वेळेस त्याचा उपयोग होतोही, पण खरं तर असं करणं धोक्याचं ठरू शकतं. तो प्रयोग तुमच्या चेहºयाला सूट नाही झाला, तर चेहऱ्याचं सौंदर्य आणखी बिघडू शकतं. त्यातही या प्रयोगांमध्ये जर केमिकल्सचा, बाजारातल्या वेगवेगळ्या क्रिम्सचा समावेश असेल तर चेहऱ्याची पार वाट लागू शकते.पण या साºयांत एक उत्तम घरगुती उपाय आहे, तो म्हणजे जांभळाचा. जांभळाच्या साहाय्यानं तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य तर वाढवू शकतातच, पण तुमच्या चेहऱ्याव्ररील सुरकुत्याही गायब करण्याची शक्ती या जांभळामध्ये आहे.
अरेरे, चेहऱ्यावर सुरकुत्या? आणि त्याही ‘या’ वयात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 5:41 PM
ऐन तारुण्यात चेहऱ्यावर सुरकुत्या आणि चेहऱ्याची रया गेली असेल तर फक्त पाच मिनिट वेळ काढा..
ठळक मुद्देजांभळाच्या उपयोगानं जाऊ शकतात सुरकुत्याजांभळांनी सौंदर्यही खुलतंकाही दिवसांत दिसेल फरक