हिंगोली जिल्ह्यात बुधवारी हिंगोली २, वसमत ८, सेनगाव ३, कळमनुरी १७ अशा ३० ॲण्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. मात्र, यात एकही बाधित आढळला नाही. तर, आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीच्या विद्यानगरचे ५, आनंदनगर १, माळहिवरा ३ तर कळमनुरी तालुक्यातील घोळवा येथील १ असे एकूण १० बाधित आढळले. बरे झालेल्यांमध्ये संतूक पिंप्री १, विद्यानगर १, केळा १, हिंगोली १, बळसोंड १, रामगल्ली १ या ६ जणांचा समावेश आहे. तर कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर १, कनका १, कळमनुरी १ या तिघांचा समावेश आहे.
कोरोनाचे एकूण ३,६१८ रुग्ण झाले आहेत. ३,४९२ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला एकूण ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्ड येथे भरती असलेल्या रुग्णांपैकी चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. एका रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यास बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. एकूण पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आराेग्य विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.