लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दलित वस्ती सुधार योजनेतील नवा पंचवार्षिक आराखडा शनिवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यात एकूण ११४२ दलित वस्त्यांचा समावेश असून यावर्षीच्या निधीतून यातील वस्त्यांमध्ये कामे घेता येणार आहेत. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.गतवर्षीचा निधी मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीत अडकल्याने अजूनही त्यातील कामे बºयाचअंशी बाकी आहेत. ही स्थगिती उठल्याचे सांगितले जात असले तरीही त्याबाबत अजूनही लेखी काहीच आलेले नाही. त्यामुळे प्रशासन संभ्रमातच आहे. यापूर्वीही ही कामे सुरू होण्याच्या वेळीच स्थगिती आली होती. मात्र आदेश येण्यापूर्वी तोंडीच स्थगिती देवून प्रशासनाने सुरू होणारी वा झालेली कामेही थांबविली होती. आता स्थगिती उठविल्याचे सांगितले जात असल्याने कामे सुरू करण्यास तोंडीच सांगितल्यास गती मिळू शकते.जुन्या निधीचाच प्रश्न असल्याने व नवीन आराखड्यामुळे यंदाच्या २६ कोटींचे नियोजनही होत नव्हते. आता २0१८-१९ ते २३-२४ या पंचवार्षिकचा आराखडा सादर झाला व मंजूरही झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांनी दिली.यात एकूण ११४२ दलित वस्तींचा समावेश आहे. हिंगोली २७४, कळमनुरी २१३, वसमत २२७, औंढा १८९ तर सेनगावातील २३९ वस्त्यांचा यात समावेश आहे. नवीन कामे मंजूर होण्यासाठी पात्र असणाºया व वंचित वस्त्यांचे प्रस्ताव गटविकास अधिकाºयांनी सादर करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. यात यापूर्वी वंचित राहिलेल्या व लाभ देणे शिल्लक असलेल्यांना प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. तर होणारे काम हे दलित वस्तीतच होणार आहे, याची खात्री झाल्यावरच प्रस्ताव द्यावयाचा आहे. याशिवाय स्थळ पाहणी अहवालावर सरपंच, ग्रामसेवक, वस्तीसाठीचा ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ अभियंता यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. तर ग्रामपंचायतीचा ठरावही घ्यावा लागणार आहे. तर स्थळ नकाशाही द्यावा लागणार आहे.आता प्रशासनाने नवीन कामांबाबत प्रक्रिया सुरू केली असल्याने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीला नियोजनाची तयारी करावी लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर केवळ चर्चा होत असून काही जि.प.सदस्य आता या नियोजनासाठी गडबड करताना दिसत आहेत.गेल्या काही दिवसांपासून मंदावलेली जिल्हा परिषदेतील गर्दी पुन्हा एकदा दिसणार असल्याची चिन्हे आहेत. काही सदस्य तर आधीपासूनच यासाठी बोंब ठोकत होते. आता त्यांचीही मागणी यामुळे पूर्ण होण्याची चिन्हे दिसून येऊ लागली आहेत.दलित वस्ती सुधार योजेनेत गावांचे प्रस्ताव येण्यासाठी जि.प.सदस्य याद्यांची पाहणी करताना दिसत आहेत. कामे सुचविताना प्रस्तावच नसल्याची बोंब न होण्याची काळजी घेतली जात आहे.
नव्या आराखड्यात ११४२ दलित वस्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:11 AM