लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : पहिली ते पाचवीच्या अध्ययन स्तर निश्चितीत तालुक्यातील ११५ वर्गांची भाषा, गणिताची गुणवत्ता ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली.या वर्गांवर अध्यापन करणाºया २०५ शिक्षकांना २८ फेब्रुवारी रोजी गुणवत्तावाढीसाठी कळमनुरी व आखाडा बाळापूर येथे बुस्टर प्रशिक्षण देण्यात आले. भाषा व गणित विषयाची अध्ययन स्तरनिश्चिती करण्यात आली. समूह संसाधन गटाद्वारे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे भाषा व गणित विषयात प्रारंभिक स्तर ते उतारा गोष्ट समजपूर्वक वाचन, गणितात प्रारंभिक स्तर ते भागाकार याबाबत अध्ययन स्तर निश्चिती तपासण्यात आली. कोणत्या स्तरावर किती विद्यार्थी आहेत, याबाबत विद्यार्थ्यांचे सविस्तर मूल्यांकन करण्यात आले. अध्ययनस्तर निश्चिती २६ ते ३० जानेवारीदरम्यान करण्यात आली. १ ते ५ वीचे किती विद्यार्थी भाषा गणितात प्रगत आहेत, याबाबतही मूल्यमापन करण्यात आले. यात तालुक्यातील १ ते ५ वीच्या ११५ वर्गाची भाषा व गणिताची गुणवत्ता ६० टक्क्यांपेक्षा कमी आढळून आली. भाषा, गणितात विद्यार्थी प्रारंभिक स्तरावरून उच्च स्तरावर जावेत यासाठी शिक्षकांनी तीन महिने प्रयत्न करावयाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत १ ते ५ विद्यार्थी १०० टक्के प्रगत झालेच पाहिजे, असा आग्रह शिक्षण विभागाचा आहे. तीन महिन्यांत विद्यार्थ्यांना भाषा व गणिताच्या मूलभूत संकल्पना येण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. २८ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील २०५ शिक्षकांना बुस्टर ट्रेनिंग देऊन विद्यार्थ्यांना तीन महिन्यात कसे १०० टक्के प्रगत करता येईल, विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना कशा दृढ कराव्यात, याबाबत शिक्षकाकडून प्रशिक्षणात कृती आराखडा तयार करून घेण्यात येणार आहे.एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा १ ते ५ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चिती होणार आहे. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना तीन महिन्यात प्रगत कसे करावे, याबाबत बुस्टर मार्गदर्शन केले. एप्रिलअखेर तालुका १०० टक्के प्रगत करण्याचा मनोदय गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
११५ वर्गांची गुणवत्ता ६० टक्क्यांपेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:54 AM