लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला कळशी उचलून देण्याच्या बहाण्याने गावातील एका तरुणाने तिचा विनयभंग केला. सदर बालिकेच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव येथील १३ वर्षीय मुलगी शाळेला सुट्ट्या लागल्याने गावाकडे आली. ती शिरळी येथील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिकते. शाळेला सुट्ट्या लागल्याने ती भावंडासमवेत आईवडीलांकडे आली. २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शेजारच्या शेतातील विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेली. डोक्यावर भांडे आणि हातात कळशी घेऊन निघाली असता तिला एकटीला पाहून गावातील मच्छिंद्र शिवाजी डवरे या तरुणाने तिच्या हातातील कळशी घेतली व तिच्या डोक्यावरील भांड्यावर ठेवली व तिचा विनयभंग केला. तिने पळत घरी येऊन ही घटना आई-वडिलांना सांगितली. त्या तरुणाच्या घरी जाऊन जाब विचारला असता त्याने तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणून दम भरला. अखेर पीडित मुलगी, आई, वडिल यांनी पोलीस ठाणे गाठले. पिडीत बालिकेच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात मच्छिंद्र शिवाजी डवरे यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३५४ (अ) व पोक्सो कायद्यांच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार सविता बोधनकर करीत आहेत.
१३ वर्षीय मुलीचा पेठवडगावात विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:00 AM