शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

चोरी रोखण्यासाठी १३२ पोलीस ठाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 12:25 AM

दिवसेंदिवस वीजचोरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. वीजचोरीमुळे महावितरण तोट्यात चालली आहे. मोहीम व धडक कारवाई करूनही वीजचोरी वाढत चालली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिवसेंदिवस वीजचोरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. वीजचोरीमुळे महावितरण तोट्यात चालली आहे. मोहीम व धडक कारवाई करूनही वीजचोरी वाढत चालली आहे. त्यामुळे आता वीजचोरी करणाºयांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. ज्या ठिकाणी वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, तेथील ठाण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गृह विभागाने राज्यातील १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.या संदर्भाचे परिपत्रकही गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी काढले आहे. या १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंचाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येतील. मोठ्या शहरांमध्ये ५ पोलीस ठाण्यांना वीजचोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणचे ६ पोलीस ठाणे बंद करण्यात आले आहेत.वीजचोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात ४ पोलीस ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात ५, बीड ४, ठाणे जिल्ह्यात १०, धुळे ३, हिंगोलीत ३, नांदेड ४ पोलीस ठाणे नाशिक ५, जालन्यात ३, परभणीत ३, उस्मानाबाद ३, लातूर ३, नागपूर शहर व ग्रामीण मिळून ७ या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.आकडेवारी : राज्यभरातील ठाण्यांची संख्यापुणे शहर व ग्रामीण मिळून ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीची तक्रार दाखल करता येणार आहे. सोलापूर ४, अकोला ३, अमरावती ४, भंडारा २, बुलढाणा २, चंद्रपुर ३, गडचिरोली २, गोंदिया ३, जळगाव ४, कोल्हापूर जिल्हयात २, नंदूरबार ३, पालघर ६, रायगड ४, रत्नागिरी २, सांगली ३,सातारा ३, सिंधुदुर्ग २, वर्धा २, वाशिम ३, यवतमाळ ४, मुंबई शहर व उपनगरात ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती नांदेड परिमंडळातर्फे देण्यात आली आहे. याबाबत जागृतीही केली जात आहे.कोणीही वीजचोरी करू नये, असे करताना आढळून आल्यास संबधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले.