यामध्ये हिंगोली १२.२० मिमी, कळमनुरी ९ मिमी, वसमत १८.१० मिमी, औंढा २८.७० मिमी, सेनगाव ९.३० मिमी अशी तालुकानिहाय सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात हिंगोली ८५.५० मिमी, कळमनुरी ११६.८० मिमी, वसमत १३२. २० मिमी, औंढा १५४.४० मिमी, सेनगाव १२७.३० मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी १५.१३ टक्के पर्जन्यमान झाले आहे. सर्वाधिक २०.९८ मिमी पावसाची नोंद औंढा तालुक्यात झाली आहे.
मंडळनिहाय असा पाऊस
हिंगोली तालुक्यात हिंगोली १८.५ मिमी, सिरसम ७ मिमी, बासंबा ६.३ मिमी, माळहिवरा ३८.८, माळहिवरा ३, खांबाळा ११.५, कळमनुरी तालुक्यात कळमनुरी ५.८, वाकोडी ४.८, नांदापूर ९, डोंगरकडा ९, वारंगा फाटा २५.५, वसमत तालुक्यात वसमत ३४.५, आंबा ०.८, हयातनगर १८.१, गिरगाव १३.५, हट्टा ५.८, टेंभूर्णी ४१.८, कुरुंदा १२.५ मिमी अशी नोंद झाली. औंढा तालुक्यात औंढा २७.३, येहळेगाव ४५.३, साळणा १८.३, जवळा बा. २४, सेनगाव तालुक्यात सेनगाव १२, गोरेगाव ३.५, आजेगाव २४, साखरा ३.३, पानकनेरगाव १.३, हत्ता ११.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.