रॅपिड अँटिजन चाचणीत हिंगोली परिसरात १४३ पैकी जिजामातानगर १ व सरस्वतीनगरात २ रुग्ण आढळून आले. सेनगाव परिसरात सवन्यात दोन रुग्ण आढळले. वसमत परिसरात २११, औंढा परिसरात ६०, कळमनुरी परिसरात ११० चाचण्या करूनही कोणी बाधित आढळले नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात कडपदेव १, अकोला बायपास १, पोस्ट ऑफिस रोड १, शिवाजीनगर १, जिजामातानगर १, माउलीनगर १ असे ६ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात देवजना २, सेनगाव परिसरात मलासपूर १, वसमत परिसरात मरसूलवाडी १ असे १० रुग्ण आढळले. बरे झाल्याने आज ५० रुग्णांना डिस्चार्ज दिला. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून ३२, कळमनुरी ४, सेनगाव ४, लिंबाळा ४, वसमत ४ व औंढा येथून २ जणांना डिस्चार्ज दिला.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ७५९ रुग्ण झाले असून, त्यापैकी १५ हजार १५२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला जिल्ह्यात एकूण २४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ३६६ व्यक्तींचा मृत्यू झाला. सध्या दाखल रुग्णांपैकी ८५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर १६ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात दोन मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात आज कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात वाशिम जिल्ह्यातील रिसोडच्या ७० वर्षीय महिलेचा तर उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे आखाडा बाळापूर येथील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.