हिंगोली : /आर्थिक /दुबल घटकातील मुलींनी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहू नये, म्हणून शासनाने कस्तूरबा गांधी विद्यालयाच्या माध्यमातून आधार दिला आहे. त्यांच्या निवासापासून ते शिक्षणापर्यंतची सर्व व्यवस्था करण्यात आल्याने जिल्ह्यातील १५0 शाळाबाह्य मुलींच्या हातात आज पुस्तके आहेत.
शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवल्या जातात; परंतु मुलींसाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. शाळाबाह्य मुलींसाठी स्वतंत्र योजना नसल्याने सर्वशिक्षा अभियानातंर्गत २00५-0६ शैक्षणिक वर्षात कस्तुरबा गांधी योजनेस सुरूवात केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातंर्गत शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरातील हे विद्यालय चालवले जाते. त्यात वर्ग ६, ७ आणि ८ वीच्या १00 मुली शिक्षण घेतात. दरम्यान, मानव विकास मिशनने त्यात भर घातली. दोन वर्षांपूर्वी ९ व १0 वीचे वर्ग सुरू झाले. आणखी ५0 मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. आठवीपर्यंतच्या मुलींना एकाच हॉलमध्ये व्यवस्था आहे. पुढील दोन वर्गांसाठी स्वतंत्र निवास आहेत. सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिकवणी असते. त्यासाठी १0 शिक्षकांचा स्टाफ असून ३ सेवक आहेत. शिकवणीसाठी ५ वर्गखोल्या तर १ संगणकासाठी आहे./(प्रतिनिधी)
■ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे शाळेवर पाणी सोडलेल्या मुलींसाठी मोफत शिक्षणाची सोय व्हावी, हा उद्धेश या योजनेचा आहे. त्यात निवासाची व्यवस्था अंतभरूत आहे. तसेच सकाळी ८ वाजता अल्पोपहार, दुपारी १२ आणि सांयकाळी ६ वाजता भोजन दिले जाते. शिवाय पुस्तके, गणवेश, आरोग्याची तपासणी केली जाते. इतर खर्चासाठी वर्षाकाठी १५00 रूपयांचा निर्वाह भत्ताही दिला जातो.
■ शाळेत जवळपास सर्व सुविधा मिळतात. सध्या कोणतीही अडचण नाही. शिकवणीही होत असल्याची प्रतिक्रिया सहावीत शिकणार्या अर्चना दांडेकर हिने दिली.