शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

महिनाभरात १९ आगी; अग्निशामक बंब एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:38 AM

अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांत वाढ होत आहे. महिनाभरात शहरासह ग्रामीण भागात १९ आग लागल्यच्या घटना घडल्या आहेत.मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढतच चालला आहे. तापमानात वाढ होत असल्याने अचानक आग लागण्याच्या घटनांतही वाढ होत आहे. २३ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान आगीच्या १९ घटनांची नोंद पालिकेच्या अग्निशामक दलाकडे करण्यात आली आहे. महिनाभरात आग लागून नुकसानीच्या घटनामध्ये वाढ होत चालली असली तरी, पालिकेकडे सध्या एचक अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. एक अग्निशामक मागील सहा महिन्यांपासून नादुरूस्त झाल्याने भंगारात जमा करण्यात आले आले आहे. नवीन अग्निशामकची मागणी केली असून लवकरच पालिकेकडे वाहन उपलब्ध होईल. शिवाय नागरिकांनी दक्ष राहून आगीच्या घटनांबाबबत तात्काळ माहिती द्यावी. व आग लागू नये याची खबदारी सर्वांनीच घ्यावी असे अग्निशामक विभागाचे बाळू बांगर यांनी केले .हिंगोली शहरासह ग्रामीण भागात मागील एका महिन्यात आग लागल्याचे जवळपास १९ घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात अचानक आग लागून घरांचे, दुकानांचे तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु हिंगोली नगर पालिकेकडे मागील सहा महिन्यांपासून केवळ एकाच अग्शिामक वाहनांवर काम सुरू आहे.पुर्वी दोन अग्निशाम होते. परंतु त्यातील एक वाहन नादुरूस्त झाल्याने ते भंगारात जमा केले. त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार एकाचा वाहनांवर सुरू आहे. नवीन अग्निशामक वाहनाची मागणी करण्यात आली आहे. लवकरच पालिकेला वाहन मिळणार आहे.सध्या कडाक्याचे उन्ह पडत असून तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बीडी, सिगारेटमुळे पेट धरून आग लागेल असे कृत्य कोणी करू नये, शिवाय कचराही सार्वजनिक ठिकाणी जाळू नये.इडोळी येथे आग लागून साहित्य खाक४हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील ज्ञानबा विठोबा पानपट्टे यांच्या आखाड्याला आग लागल्याची घटना २१ एप्रिल रोजी घडली. आगीत शेतीपयोगी औजारे, जमा करून ठेवलेले तुरीचे व, सोयाबीनचे कुटार, वैरण, दोन वर्षाचे शेणखत, गांडूळ खताचे १०० कट्टे अंदाजे ५० क्विंटल असे साहित्य जळून खाक झाले आहे. त्यांनी अग्नीशमनला फोन करून दोन विद्युत मोटारी चालू असूनही ही आग आटोक्यात येत नव्हती. अग्नीशमन दल आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या शेतकºयाकडे १० जनावरे आहेत. वैरण जळून खाक झाल्यामुळे या गुरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून काही नुकसान भरपाई मिळेल का? असा प्रश्न पानपट्टे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग