जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोलीत १७०पैकी एसआरपीएफमध्ये १ रुग्ण आढळला. सेनगावात ८०, औंढ्यात २०९, वसमतला १०४, तर कळमनुरीत ३९० चाचण्या करूनही कोणी बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत औंढ्यात ४९पैकी काठोड्यात एक बाधित आढळला. हिंगोलीत ४६, कळमनुरीत १७३, वसमतला ८२, तर सेनगावात २४पैकी एकही बाधित आढळला नाही. आज बरे झालेल्या ४ जणांना हिंगोली येथील नवीन कोविड सेंटरमधून घरी सोडण्यात आले. नवीन कोविड सेंटरमध्ये पुसद तालुक्यातील दगड धानोरा येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १५ हजार ९६० रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ५६३ जण बरे झाले, तर आजपर्यंत ३८५ जणांचा मृत्यू झाला. सध्या १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवले, तर २ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.