शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

१८ गावांसाठी २0 टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:51 PM

उन्हाळ्यातील शेवटचा महिना असल्याने अधिग्रहणे व टँकरची संख्या मागील पंधरा दिवसांत झपाट्याने वाढत चालली आहे. १८ गावांत २0 टँकरच्या ३६ खेपा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : उन्हाळ्यातील शेवटचा महिना असल्याने अधिग्रहणे व टँकरची संख्या मागील पंधरा दिवसांत झपाट्याने वाढत चालली आहे. १८ गावांत २0 टँकरच्या ३६ खेपा सुरू असल्याचे दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा अल्पपर्जन्यामुळे सगळीकडेच पाण्यासाठी हाहाकार उडालेला आहे. मात्र सर्वच गावांची तहान टँकरवर भागविणे शक्य नाही. अनेक गावांत अधिग्रहणासाठी स्त्रोत उपलब्ध असतानाही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ टंचाईचा सामना करीत आहेत. विशेष म्हणजे गावातील वादातून टंचाई भोगणारे ग्रामस्थ शेतात तीन किमी अंतरावर जाऊन पाणी आणत असल्याचेही चित्र काही ठिकाणी आहे.ही विदारक स्थिती असताना ज्या गावांतून वेळेत प्रस्ताव आले, तपासणी झाली अशा गावांना मात्र टँकरने पाणीपुरवठा अथवा अधिग्रहण करण्यात आले आहे. हिंगोली तालुक्यात ४ गावे व एका वाडीला एका शासकीय व सहा खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ९ खेपा होत आहेत. ४२५0 लोकसंख्येची तहान यावर भागत आहे. तर टँकरसाठी तीन व त्याशिवाय ३५ स्त्रोत अधिग्रहित केले आहेत. कळमनुरी तालुक्यात ८ गावांत सहा खाजगी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यात टँकरसाठी ७ तर इतर ४५ अशा ५२ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. एकूण ८0८५ लोकसंख्येची तहान टँकरवर भागत आहे.सेनगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये ६ टँकरच्या ९ खेपा होत आहेत. टँकरसाठी ४ तर इतर ४४ स्त्रोतांचे अधिग्रहण करून तालुक्याची तहान भागविली जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यात २ गावे ३ वाड्यांसाठी ३ टँकरद्वारे ९ खेपा सुरू आहेत. यात टँकरसाठी ३ तर इतर ठिकाणी ३४ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे.टँकर : तालुकानिहाय गावेतालुकानिहाय टँकरग्रस्त गावेहिंगोली तालुक्यात कनका, पेडगाव वाडी व जुमडा, अंधारवाडी, वºहाडी, कळमनुरी तालुक्यात माळधावंडा-खापरखेडा, मसोड, हातमाली, रामवाडी, शिवणी खु., महालिंगी तांडा, कुपटी, सेनगाव तालुक्यातजयपूर, जवळा बु., कहाकर खु., बटवाडी, औंढा तालुक्यात संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळापाणी तांडा, सेवादास तांडा या गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे टँकरच्या खेपा वाढत आहेत.अनेक गावांचे टँकर व अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. पाहणीअंती काही ठिकाणी या दोन्ही उपायांबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अशी गावे तहानलेलीच आहेत.रस्त्यांची अडचण४जिल्ह्यातील काही गावांत रस्त्यांची अडचण असल्याने टँकर पंक्चर होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक टँकरच्या प्रतीक्षेत राहतात अन् ते वेळेवर येत नाही, असे प्रकार घडत आहेत. काही टँकरच्या योग्य स्थितीत नाहीत. त्यामुळे ही एक अडचणही समोर येत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीwater shortageपाणीटंचाई