परभणी विभागाअंतर्गत गंगाखेड, पाथरी, परभणी, जिंतूर, हिंगोली, वसमत, कळमनुरी हे ७ आगार येतात. कळमनुरी आगारातून १४, हिंगोली ३२, वसमत ३० असे जिल्ह्यातील आगारांतून ७६ चालक -वाहक तर परभणी जिल्ह्यातील ४ आगारांतून १२८ चालक-वाहक मुंबई येथील कुर्ला येथे ड्युटीसाठी जात आहेत. मुंबई येथे एसटीला चालक-वाहक कमी पडत असल्यामुळे परभणी विभागातील चालक -वाहक मुंबई येथे जात आहेत. चालक-वाहक प्रत्येकी पंधरा दिवस ड्युटीसाठी जात आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वच चालक-वाहकांना पंधरा दिवसांसाठी मुंबई येथे पाठविण्यात येत आहे. हे चालक-वाहक मुंबई येथे जात असल्यामुळे परभणी विभागातील सातही आगारांत चालक - वाहक कमी पडत आहेत. परिणामी ग्रामीण भागात बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत. ग्रामीण भागात बसेस सोडण्यात आल्या नसल्यामुळे अवैध वाहतूक बोकाळली आहे. स्थानकप्रमुख शेख फेरोज हेही मुंबई येथे ड्युटीवर जात आहेत.
परभणी विभागातील २०४ चालक - वाहक मुंबई येथे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:30 AM