लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती २०१८-१९ साठीच्या शिष्यवृत्ती वाटपासाठी नवीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयारी करण्यात आली असून जिल्ह्यातील एकूण २०८८ विद्यार्थीसंख्या शंकास्पद आढळून आली आहे. शंकास्पद अर्जांची तत्काळ पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शासनाकडून पहिली ते दहावीतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिले जाते. २०१८-१९ साठी पी्र-मेट्रिक शिष्यवृत्ती वाटपासाठी शासनाकडून नवीन विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. परंतु या यादीत काही शंकास्पद विद्यार्थी आढळून आले आहेत. त्यामुळे अशा शंकास्पद विद्यार्थ्यांची यादी पुन:श्च पडताळणीसाठी त्या-त्या तालुक्यांना परत पाठविली आहे. या संपूर्ण यादीतील तालुक्याचे कोणते विद्यार्थी आहेत ते शोधावे लागणार असून त्यानुसार दिलेल्या यादीतील विद्यार्थी तालुक्यातील, शाळेतील, विद्यार्थी प्रत्यक्ष शिकत आहेत की नाही, याची प्रत्यक्ष खात्री संबंधित मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे. जर शाळा संबंधित तालुक्यातील नसेल किंवा शंकास्पद विद्यार्थी असल्यास त्यांना रिजेक्ट करावे लागणार आहे. तर शंकास्पद नसल्यास त्या विद्यार्थ्यांना अॅसेप्ट करून सॉफ्ट व हार्ड कॉपी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी २० फेबु्रवारीपर्यंत जिल्हा कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी दिलेल्या मुदतीमध्ये माहिती उपलब्ध न केल्यास व शंकास्पद विद्यार्थ्याच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार आहे. अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीच्या शंकास्पद अर्ज पडताळणीच्या सूचनाही संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाºयांना तीन दिवसांपूर्वीच पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.केंद्र शासनाने सदरकामी केवळ एक आठवड्याची मुदत दिली असून शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत शंकास्पद असलेले व बनावट ठरलेले विद्यार्थी यादीतून वगळण्यात आले नाही तर शिष्यवृत्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास पात्र असलेले परंतु केवळ शंकास्पद विद्यार्थ्यांमुळे गणुवत्ता यादीत न आलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीतच संबंधित यंत्रणेने शंकास्पद अर्जांची पडताळणी करण्याचे पत्र अल्पसंख्याक प्रौढ शिक्षणच्या संचालकांनी दिले आहे.अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालकांनी पाठविलेल्या पत्रानुसार शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी गटशिक्षणाधिकाºयांना परिपत्रकाद्वारे सूचनाही दिल्या आहेत.
शिष्यवृत्तीचे २०८८ विद्यार्थी शंकास्पद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:56 AM