लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तीन दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील तब्बल २१ लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. तर इसापूर धरण ६५ टक्क्यांवर पोहोचले आहे.हिंगोली तालुक्यात पारोळा, वडद, चोरजवळा, सवड, पेडगाव, हातगाव या तलावांमध्ये १00 टक्के जलसाठा झाला असून हिरडी तलाव ८५ टक्के भरला आहे. सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, बाभूळगाव तुडुंब भरले असले तरीही घोडदरीत अवघा २१ टक्के जलसाठा आहे.औंढा तालुक्यातील वाळकी, औंढा, सेंदूरसना, पुरजळ, पिंपळदरी व काकडदाभा हे तलाव १00 टक्के भरले आहेत. तर सुरेगाव ७0 टक्के, वंजारवाडी ९७ टक्के, केळी-८८ टक्के भरले आहेत.कळमनुरी तालुक्यात कळमनुरीसह बोथी, दांडेगाव, देवधरी तलाव तुडुंब भरले आहेत. तर पूर्णा तालुक्यातील मरसूळ व वसमत तालुक्यातील राजवाडी तलावही १00 टक्के भरला आहे. त्यामुळे एकूण २६ प्रकल्पांपैकी २१ तुडुंब भरल्याने या भागातील गुरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.काही प्रमाणात सिंचनासही पाणी उपलब्ध होते. या सर्व प्रकल्पांची जलसंचय क्षमता ५४.४१ दलघमी एवढी आहे. तर यामध्ये ५0 दलघमी पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण ९४ टक्के एवढे आहे.कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा १00 टक्के भरला. तर हिंगोली तालुक्यातील खेर्डा ३३ टक्के भरला.इसापूर धरण ६५ टक्क्यांवरइसापूर धरणातील जलसाठा सकाळी ५९८ दलघमी जिवंतसाठा होता. हे प्रमाण ६२ टक्के होते. सायंकाळपर्यंत ६५ टक्क्यांवर पोहोचला होता. मागील अनेक वर्षांत या धरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर येलदरी धरण पाच टक्क्यांवर गेले असून सिद्धेश्वर धरणातील जलसाठा १७ टक्क्यांवर गेला आहे. मागील वर्षी या तारखेपर्यंत इसापूरमध्ये अवघा पाच टक्के तर येलदरीत ३.९४ व सिद्धेश्वरमध्ये ८.५४ टक्के जलसाठा होता.
२१ लघुप्रकल्प तुडुंब भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:33 AM