हिंगोली जिल्ह्यात ३० रोजी अँटिजन चाचणीत १०९ पैकी १ बाधित आढळून आला. यामध्ये हिंगोली परिसरात ८५ पैकी लोहगाव येथील एक महिला बाधित आढळली. वसमतला ११, सेनगावात १२ व औंढ्यात १ चाचणी केली असता कुणीही बाधित आढळले नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात इसापूर ५, रामाकृष्णा कॉलनी १, नाईकनगर २, हिंगोली २, जिजामातानगर १, लिंबाळा १, तोफखाना १, खिल्लार १, नवीन मोंढा १ असे एकूण १५ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात सुलदली १, भानखेडा १, बाभणी १, लिंबाळा हुडी १ असे ४ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात कडपदेव येथे एक बाधित आढळला. आज बरे झालेल्या ६६ जणांना घरी सोडण्यात आले. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून ४१, कळमनुरीतून ११, वसमतमधून ३, सेनगावातून १, लिंबाळा येथून ७ तर औंढा येथून ३ जणांना घरी सोडण्यात आले.
आजपर्यंत जिल्ह्यात १५ हजार ६४८ रुग्ण आढळून आले. यापैकी १४ हजार ९५६ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला तर सध्या ३३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ३५९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या दाखल असलेल्यांपैकी १२७ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. २२ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.
तिघांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात न.प. कॉलनीतील ६० वर्षीय पुरुष, लिंबी येथील ३५ वर्षीय महिला, सेलसुरा येथील ४० वर्षीय महिलेचा यात समावेश आहे.