शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

२११ ग्रामपंचायत सदस्य बसले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:24 AM

दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्ह्यातील तब्बल २११ ग्रा.पं.सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून काही ठिकाणी तर एकही सदस्य न उरल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्ह्यातील तब्बल २११ ग्रा.पं.सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून काही ठिकाणी तर एकही सदस्य न उरल्याचे चित्र दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात आॅगस्ट व आॅक्टोबर २0१७ मध्ये झालेल्या अनुक्रमे १३ व ४९ ग्रा.पं.च्या निवडणुकीतील तब्बल २२३ उमेदवारांनी निवडणूक खर्च दाखल केला नव्हता. अशा सर्व उमेदवारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर २२ ते ३१ जानेवारीदरम्यान सुनावणी झाली होती.मात्र वरीलपैकी केवळ १0 वगळता उर्वरितांनी निवडणूक खर्च दाखल केला नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी पी.एन. बोरगावकर यांनी या सर्व सदस्यांना अनर्ह ठरविण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याचे अंतिम आदेश सोमवारी आता निघाले असून त्यात २११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील बबनराव मुंढे, भटसावंगी येथील नामदेव ठोंबरे, केशव कºहे, मुक्ता मस्के, भटसावंगी तांडा येथील सुभाष जाधव, सुला जाधव, कमलबाई राठोड, शांताबाई राठोड, कैलास राठोड, यशवंत राठोड, गोपीचंद राठोड, यशोदा जाधव, गोपाबाई चव्हाण, शिवाजी राठोड, यशोदा आडे, सविता जाधव, प्रवीण राठोड, वडद/एकांबा येथील राजू वसू, भागवत वसू, संतुक पिंपरी येथील उत्तम दीपके, संजय दीपके, साजीयाबी सय्यद नाझीम, शकी सय्यद हबीब, काळकोंडी येथील विनोद जाधव, रूख्मीना जाधव, इडोळी येथील पुष्पा पानवट्टे, गजानन घाटूळकर, पुष्पा भिसे, कलावती टेकाळे, सविता जाधव, सयाबाई जाधव, बद्रीनाथ पानपट्टे, प्रल्हाद टेकाळे, ब्रह्मपुरी येथील अनूसया रणबावळे, सिंधू तावरे, रामेश्वर लोकडे, मालवाडी-चिखलवाडी येथील पवन चव्हाण, प्रियंका जराड, कविता बुद्रूक, अजय मिटकरे, आडगाव येथील सुनीता मुटकुळे, रमेश मुटकुळे, साधना हनवते, हनवतखेडा येथील प्रभापती आठरे, लक्ष्मीबाई आठरे, गीताबाई आठरे, राजेश्वर कीर्तनकार, विशाल कांबळे, भाग्यश्री कांबळे, भानुदास मुटकुळे, घोटा येथील नर्मदाबाई पावडे, उषाताई शेळके, आंबिका शेळके, शांताबाई शेळके, शिवाजी पातळे, वैजनाथ पावडे, मंगल पावडे, रेणुकाबाई गांजरे, कांताबाई शेळके, वैशाली शेळके, गयाबाई शेळके, रामेश्वर शेळके, भगवान शेळके, नितीन वानखेडे, वर्षा पावडे, सुभद्राबाई लांबडे, कौशल्या गडगिळे, कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर त. शेवाळा येथील संभाजी खिल्लारे, राजाबाई बहात्तरे, योजना टाक, नारायण उपरे, अर्चना बुरकुले, पांडुरंग खिल्लारे, मोहन खिल्लारे, रमेश माने, निर्मलाबाई उपरे, घोडा येथील कविता पतंगे, टाकळी कान्होबा येथील रूख्मीना भालेराव, येलकी येथील कामिनी पतंगे, शशिकला भुक्तर, भगवानराव पतंगे, नजीरा बेगम पठाण, किशोरखॉ पठाण, कैलास कापसे, वारंगाफाटा येथील संगीता नरवाडे, विनायक पतंगे, पंडितराव कदम, गौतम थोरात, कुर्तडी येथील सपना कदम, विमल नरवाडे, गणपतराव लुटे, लक्ष्मण लुटे, पंचफुलाबाई वाठोरे, रत्नमाला नरवाडे, दत्ता कदम, बाळू नरवाडे, बाबूराव नरवाडे, दीपक जाधव, राजकुमार जाधव, श्रीनिवास पानपट्टे, जिजाजी पारडकर, कांताबाई बाराटे, गंगासागर लुटे, भारताबाई जाधव, सुरेखा जाधव, कुंभारवाडी त. कुर्तडी येथील मारोती शेळके, मसोड येथील तानाजी सातव, शे. गौस शे.अहमद, मंगलाबाई सातव, सुमेध मोगले, बोल्डा येथील जनाबाई जोगदंड, श्रावण ढोकणे, शे.शमीमबी जानी, नामदेव ढोकणे, वैशाली खंडागळे, रत्नमाला ढोकणे, ज्योती कांबळे, ज्योती ढोकणे, सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील दिनकर मस्के, शारदा ठोके, विशाल ठोके, सागर गडदे, हाताळा येथील शोभा काळे, सुनीता राऊत, सारिका चोपडे, मदन काळे, दीपक काळे, इंदूबाई काळे, गोपाल इंगोले, बबन खिल्लारे, लीलाबाई काळे, जिजाबाई गावंडे, वलाना येथील गोदावरी हेंबाडे, औंढा तालुक्यात उखळी येथील रेखा गायकवाड, लीलावती गायकवाड, वामनराव गायकवाड, शालूबाई वाव्हळ, अनुसया अंभोरे, प्रकाश वाघमारे, रामेश्वर येथील मीना घाटोळकर, उत्तम जाधव, प्रियंका शेगुकर, ककनाजी ठाकरे, देवीदास ठाकरे, मंजुळाबाई येळणे, कुशावती ढाकरे, शिरडशहापूर येथील नाजेरा बेगम सय्यद, रशिद जानमहंमद शेख, प्रगती ढेंबरे, नंदा सूर्यतळ, सागर रावळे, गजानन स्वामी, पांडुरंग शेळके, सुशिल अकमार, विलोप परतवार, उंडेगाव येथील भाऊसाहेब वावरे, रंजनाबाई वावरे, आशामती डोबे, तारामती देशमुख, माणिक देशमुख, आशामती पोटेकर, आशामती भारशंकर, गोजेगाव येथील सुनीता खिल्लारे, सचिन खिल्लारे, शिवप्रसाद सांगळे, शारदा नागरे, महादू जायभाये, लक्ष्मीबाई खिल्लारे, राम खिल्लारे, प्रभावती सांगळे, अंजनाबाई जायभाये, वसमत तालुक्यातील कौठा येथील रेशमजी खराटे, साळूराम खराटे, वैभव गायकवाड, पंडित खराटे, लहान येथील सीमा कोरडे, संदीप कोरडे, प्रयागबाई कोरडे, मंगलाबाई कोरडे, कुडाळा येथील व्यंकटी ढवळे, राजेश चव्हाण, विरेगाव येथील बालाजी डुकरे, गंगूबाई जाधव, सखूबाई जाधव, विजयाबाई डुकरे, पद्मीनबाई डुकरे, मीराबाई सूर्य, वैजयंतीबाई सूर्य, विजय सूर्य, परळी येथील हनुमान दशरथे, मुंजाजी क्षीरसागर, प्रभावती दशरथे, तारामती दशरथे, बन्सीधर दशरथे, हेमराज दशरथे, अरूणा क्षीरसागर, सौमित्रा दशरथे, मारोती दशरथे, वाखारी येथील ज्योती अंभोरे, संगीता टोरे, एकनाथ अंभोरे, मीराबाई गवंदे, अमोल ढोेरे, अश्विनी पांचाळ, कमलबाई ढोरे, दीपाली ढोरे, ज्योती अंभोरे, रमाबाई गवंदे, गजानन गंगावळे, महमदपूरवाडी येथील नीलाबाई वायकोळे आदींचा समावेश आहे.यात गोकर्णा जायभाये, लीला जायभाय, कांचन घुगे, जाईबाई कपाटे, सखाराम गायकवाड, जिजाबा वसू, सुनीता आठरे, वैशाली शेळके, शांता शेळके, सीमा दराडे यांनी निवडणूक खर्च दाखल केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे हे १0 सदस्य या कारवाईपासून बचावले आहेत.यामध्ये काही ग्रा.पं.त तर सरपंच व सर्वच सदस्यांना निवडणूक खर्च सादर न केल्याने कारवाईला सामोरे जावे लागले. एकीकडे ग्रा.पं.चे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे निर्वाचितांना खर्च सादर करण्याचेही भान नसल्याचे दिसते.जिल्हाधिकाºयांनी सदस्यत्व रद्द केलेल्यांना विभागीय आयुक्तांकडे अपिल करण्याची एक संधी आहे. मात्र तेथेही पुरावे सादर करता न आल्यास ही संधी औटघटकेचा दिलासाच ठरू शकते.

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूक