लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : येथे एका चंदनतस्कराच्या घरावर कुरूंदा पोलिसांनी २६ जुलै रोजी दुपारी १२.२० च्या सुमारास छापा मारून ६९ हजार रूपये किमतीचा २३ किलो चंदनसाठा जप्त केला.कुरूंदा हे गाव चंदन तस्करीकरिता प्रसिद्ध असून मोठे जाळे आहे. काही दिवसांपासून या ठिकाणी छुप्या मार्गाने चंदनतस्करी सुरू होती. पोलिसांकडूनही कारवाई होत नव्हती. परंतु कुरूंदा येथील दर्गा मोहल्ला भागामध्ये एका इसमाच्या घरी गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सपोनि शंकर वाघमोडे, जमादार शंकर इंगोले, आमले, सोनुने, जाधव, विकास राठोड, वाघमारे, सांळुके, ज्योती काळे, यांच्या पथकाने छापा मारून २३ किलो चंदन जप्त केले.पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोहेकॉ तुकाराम आम्ले यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख रफिक शे. बशीर, शेख फारूख शेख लतीफ, सय्यद गौस सय्यद मुनीर, शेख अली शेख खाजा, प्रकाश पाईकराव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
२३ किलो चंदनसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:06 AM