हिंगोली: जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणात २४ तासांमध्ये पाण्याचा येवा २.५५६ दलघमी झाला असून, सद्य:स्थितीत धरणात २३२.१४६ दलघमी पाणीसाठा झाला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता भूषण कणोज यांनी दिली.
१ जूनपासून आजपर्यत धरणात पाण्याचा येवा ७६.६१६ दलघमी झाला आहे. आजमितीस जिवंत पाणीसाठा ६२.२५६ दलघमी असून धरणाच्या पाण्याची टक्केवारी ७६.८९ टक्के एवढी आहे. १ जूनपासून धरण परिसरात ५९२.०० मि.मी. पाऊस झाला आहे.
गत तीन-चार दिवसांपासून पूर्णा नदीकाठी वसलेल्या अकरा गावांमध्ये पाऊस पडत असून हे पावसाचे पाणी सिद्धेश्वर धरणात साचले जात आहे. सद्य:स्थितीत पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला गेला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा चांगले राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
फोटो आहे