लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. त्या अनुषंगाने जिल्ह्यात मागील पाच वर्षांत केलेल्या आरोग्य तपासणीत हृदयरोग आढळून आलेल्या २३४ बालकांची मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. यात अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमात ० ते ६ वयोगटाच्या अंगणवाडीतील चिमुकल्यांची तर शाळेतील ६ ते १८ वयोगटाच्या शालेय बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीत आढळून आलेल्या बालकांची मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार केले जातात. आरोग्य विभागाच्या १७ वैद्यकीय पथकांद्वारे मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येते. बालकांना औषधोपचाराबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाते.जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या सूचनाराष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत कागपत्राअभावी येणाºया अडचणींकडे लक्ष द्यावे. तसेच गरजूंना शिधापत्रिका तत्काळ वाटप केल्या जाव्यात याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबधित तहसीलदारांना सूचनाही दिल्या होत्या. त्यामुळे बालकांवर आरबीएसकेअंतर्गत उपचार करताना संबधित बालकांच्या पालकांना मदत झाली. शिवाय कागदपत्रांची जुळवणी करतानाही अडचणींचा सामना करावा लागला नाही.पालकांना आवाहनराष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रीयेसाठी जिल्हा रूग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सीएस श्रीवास, डॉ. गोपाल कदम यांनी केले.
२३४ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:19 AM