हिंगोली जिल्ह्यात अँटीजन तपासणीत ४४० पैकी ६२ बाधित आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली परिसरात ८८ पैकी ७, वसमतला८९ पैकी ९, कळमनुरीत १०५ पैकी १८, सेनगावात ६४ पेकी १२, औंढ्यात ९४ पैकी १६ बाधित आढळले. तर आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात ४४, कळमनुरी परिसरात ३४ असे एकूण ७८ बाधित आढळून आले. आज बरे झाल्याने एकूण २३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून ३५, लिंबाळा येथून ३१, वसमत येथून ६१, कळमनुरीतून ७५, औंढा येथून १९ तर सेनगावातून १५ जणांना घरी सोडले.
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १२ हजार २७३ रुग्ण आढळले. यापैकी १० हजार ७२६ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर१३२६ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ४६० जणांची प्रकृती गंभीर असून जिल्ह्यातील विविध कोरोना रुग्णालयात ते ऑक्सीजनवर आहेत. तर ४१ जणांची प्रकृती अतिगंभीर असून त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.
११रुग्णांचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात आज तब्बल ११ कोरोना रुग्ण दगावले. हिंगोलीच्या आयसोलेशन वार्डातील साहूनगर येथील ७० वर्षीय पुरुष, कुरुंदा येथील ६५ वर्षीय महिला, सेनडी, ता.हिंगोली येथील ६२ वर्षीय पुरुष, हिंगणी, ता.हिंगोली येथील ६० वर्षीय पुरुष, सेनगाव येथील ४५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तर नवीन कोविड हॉस्पिटलमध्ये नारायणनगर येथील ५२ वर्षीय पुरुष, कमलानगर येथील ७० वर्षीय पुरुष, मंगळवारा येथील ६५ वर्षीय पुरुष असे तीन जण दगावले. कवठा कोविड सेंटरमध्ये सेनगाव येथील ५५ वर्षीय पुरुष दगावला. तसेच कळमनुरी येथील सेंटरमध्ये परभणी जिल्ह्यातील मारंबा येथील ४० वर्षीय पुरुष तर कळमनुरी तालुक्यातील तुप्पा येथील ६५ वर्षीय महिला दगावली आहे.