जिल्ह्यातील २१ वीज चोरांवर कलम १२६ नुसार, तर २६३ वीज चोरांवर कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. १४८ वीज चोरांकडून २३ लाख २२ हजार रुपये महावितरणने वसूल केले आहेत. नांदेड परिमंडळांतर्गत वीज चोरांविरोधात राबविलेल्या मोहिमेत गत चार महिन्यांमध्ये नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील तब्बल ९७५ वीज चोरांना महावितरणने दणका दिला आहे. यापैकी ३७१ वीज चोरांकडून ८१ लाख ५८ हजार रुपयांची वसुली केली आहे. बील न भरणाऱ्या वीज चोरांवर विद्युत कायदा २००३ अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असेही महावितरणने सांगितले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा घालून कंपनीचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याच्या हेतूने नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी जून २०२१ पासून वीज चोरी विरोधात मोहीम उघडली आहे.
केव्हाही होऊ शकते कारवाई...
वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवसा व रात्री केव्हाही धाड टाकून वीज चोराविरोधात कारवाई करत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. वीज खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनी वीजपुरवठा दिल्यास त्यांच्यावरही वीज कायदयान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरांविरोधात प्रसंगी फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील.
-दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता.