लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : सन २०१० मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत दंगल झाली होती. यातील दोन्ही गटांतील २४ आरोपींना शुक्रवारी प्रथम न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी.आडे यांनी दंगलीत दोषी ग्राह्य धरून प्रत्येकी १५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये दोन विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. निकाल देणार असल्याने न्यायालयात व परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.औंढा नागनाथ येथे २३ सप्टेंबर २०१० रोजी रात्री १२.३० वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दंगल उसळली होती. यात तत्कालीन पोलीस निरीक्षक सी.पी.काकडे व चार पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी दोन्ही समाजातील प्रत्येकी १२आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.सदरील प्रकरण औंढा प्रथमवर्ग न्यायालयात तब्बल ८ वर्षे चालले. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सहकारी अभियोक्ता अॅड. चेतन अग्रवाल यांनी बाजू मांडली होती. अंतिम युक्तीवादानंतर न्यायाधीश एस.पी.आडे यांनी शुक्रवारी न्यायालयाचा निकाल दिला. यामध्ये विद्यमान नगरसेवक जकी काजी, अनिल देव यांच्यासह जियाउद्दीन काजी, शेख इजाज खालेद, शे.खाजा शे. इक्रोमोद्दीन, सरफराज पठाण, शफीयोद्दीन काजी, शमीकौद्दीन काजी, सलीम खतीब, शे. एकबाल खालेद, शे.जब्बार शे. खालेद, शे.जब्बार इब्राहिम, मनोज देशमुख, गजानन रेणके, गोकूळ काळे, सुंदर काळे, बबन सोनुने, सचिन देव, अमोल गोटरे, नागेश यन्नावार, विजय यकुतकर, मारोती राज व सर्व रा.औंढा यांनी न्यायालयात गावातील जातीय सलोखा कायम ठेवण्याची हमी सर्व आरोपींनी दिल.त्यांना प्रत्येकी १५०० रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. यातील आरोपींनी हा दंड न भरल्यास त्यांना १५ दिवसांच्या साधा कारावासाची शिक्षा न्यायाधीश एस.पी.आडे यांनी दिली. आरोपींकडून वसूल दंडाची रक्कम ही जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहे.शुक्रवारी दुपारी हा निकाल देण्यात येणार असल्याने येथे मोठी गर्दी जमली होती. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केल्याने परिसरास छावणीचे स्वरुप आले होते.
दंगलप्रकरणी २४ जणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:42 PM