वसमत : मतदारसंघातील रस्त्यांचे बांधकाम व सुधारणा करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून २४६ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. यातून सर्व रस्त्यांची कामे मार्गी लागतील, अशी माहिती आ. राजू नवघरे यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे वसमत तालुक्यातील रस्त्याच्या निधीसाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले आहे. यामध्ये वसमत - कळमनुरी जोडणारा रा. म. - १६१ पासून गिरगाव - वडगाव - रामेश्वर तांडा - बोथी - कांडली - बाळापूर रस्ता प्रजिमा १० किमी रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यामुळे आखाडा बाळापूर, कांडली, बोथी, रामेश्वर तांडा, वडगाव परिसरातील नागरिकांना वसमत येथे जाणे येणे सोयीस्कर होणार आहे. या रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. वसमत तालुक्यातील ग्रामीण भागाला जिल्ह्याला जोडणारे रस्ते या निधीतून होणार आहेत.