हिंगोली परिसरात ३४, वसमत १०४, सेनगाव ५५, औंढा ४१, कळमनुरी परिसरात ४७ असे २८१ संशियतांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली होती. यामध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. आरटीपीसीआर तपासणीत हिंगोली परिसरात १४ रुग्ण आढळून आले असून यात मस्तानशाहनगर १, एनटीसी १, नाईकनगर १, केसापूर १, भटवाडी १, येळी १, डिग्रस कऱ्हाळे १, मंगळवारा १, अंतुलेनगर १, जिजामातानगर १, पळसोना १, एनटीसी १, आनंदनगर १, उमरदरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कळमनुरी परिसरात साळवा २, उखळी १ असे ३ रुग्ण आढळून आले. सेनगाव परिसरात चांदेफळ १, जयपूर १, केलसुला १, खुडज १ असे ४ रुग्ण आढळून आले आहेत. वसमत परिसरात आंबा १, वसमत ३ असे ४ रुग्ण तर औंढा परिसरात बोरजा येथे १ रुग्ण आढळून आला आहे.
दरम्यान, शनिवारी ३६ रुग्ण बरे झाले आहेत. यात जिल्हा रुग्णालयातील २१, कळमनुरी ४, सेनगाव १, लिंबाळा ४, तर वसमत कोरोना केअर सेंटरमधील ६ बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत १५ हजार ७९८ रुग्ण आढळले असून त्यापैकी १५ हजार २१५ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला २१४ रुग्णांवर उपचार सुरू असून, ९५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
एका रुग्णाचा मृत्यू
हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डामध्ये उपचार घेणाऱ्या ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. हा रुग्ण सेनगाव तालुक्यातील हनकदरी येथील असून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे.