शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा २८५ क्विंटल तांदूळ पकडला

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: September 08, 2023 5:45 PM

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चौघांवर गुन्हा दाखल

हिंगोली : एका १४ चाकी ट्रकमधून काळ्या बाजारात नेला जाणारा रेशनचा २८५ क्विंटल तांदूळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. ही कारवाई ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

हिंगोली ते औंढा रोडवरून एका १४ चाकी ट्रकमधून रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात नेला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालीहोती. त्यावरून पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने औंढा रोडवरील एका पेट्रोल पंपासमोर एका ट्रकला थांबवून आतमध्ये तपासणी केली असता नायलॉनच्या पोत्यामध्ये तांदूळ आढळून आला. या बाबत चालकास विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे हा तांदूळ रेशनचा असल्याची खात्री पोलिसांना झाली.

ट्रकमध्ये ५ लाख ७० हजार रूपये किमतीचा २८५ क्विंटल तांदूळ असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी २० लाख रूपये किमतीचा ट्रक व तांदूळअसा एकूण २५ लाख ७० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस उप निरीक्षक विक्रम विठु    बोने यांच्या फिर्यादीवरून बलजिंदरसिंग गुरदीतसिंग (ट्रक चालक रा. दशमेश नगर बाफना नांदेड), फेरोजखान अहेमदखॉन पठाण (रा. पलटन हिंगोली), रऊफ खॉ युनुस खॉ (रा. पलटन हिंगोली), शेख सत्तार सहारा ट्रेडर्स (रा. वसमत) यांचेविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले यांच्या पथकाने केली. 

ट्रकवर एक पासिंग नंबर तर कॅबिनमध्ये दुसरीच पाटीपोलिसांनी ट्रक पकडल्यानंतर त्यावर एमएच २६ बीई २२८८ हा आरटीओ पासिंग क्रमांक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ट्रकच्या कॅबिनमध्ये तपासणी केली असता कॅबिनमध्ये एमएच २६ बीई २१८८ अशी आरटीओ पासिंग  क्रमांकाची पाटी आढळून आली. दरम्यान, जिल्ह्यात रेशनचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या कारवाईवरून समोरआले आहे. या पूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून रेशनचा माल जप्त केला होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी