हिंगोली : गुन्ह्यांचा तपास करताना आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालकास परत करण्याची मोहीम पोलिस प्रशासनाने हाती घेतली आहे.त्यानुसा ३१ मार्च रोजी तब्बल २९ लक्ष ३३ हजारांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.
आरोपींकडून हस्तगत व जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकास परत करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पोलिस ठाणे प्रभारींना दिल्या होत्या. त्यानुसार ३१ मार्च रोजी या संदर्भात विशेष मोहीम राबविण्यात आली. मूळ मालकास पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना मुद्देमाल परत करण्यात आला. यात २ लाख ९५ हजारांचे एकूण चार गुन्ह्यातील सोने-चांदीचे दागिणे व रोख रक्कम, २० लक्ष २० हजारांची २४ वाहने, ४ लक्ष ११ हजारांचे ३४ मोबाईल तसेच २ लक्ष ७ हजारांच्या इतर मुद्देमालाचा समावेश होता. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे आदींनी केली.
१ कोटींचा मुद्देमाल परतपोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यानंतर जप्त व हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालकास परत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत १ कोटी ८ लक्ष ३१ हजार ७१२ रूपयांचा मुद्देमाल मूळ मालकास परत करण्यात आला आहे.