हिंगोली जिल्ह्यात यंदा सुरुवातीच्या काळात चांगले पर्जन्य झाले. दरवर्षी आतापर्यंत होणाऱ्या पावसाच्या १३४ टक्के पर्जन्य झाल्याने शेतकऱ्यांना यंदा पेरण्या वेळेत करता आल्या. मात्र, मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे आता पिके माना टाकू लागले होते. त्यातच काल रात्री झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वत्रच हा पाऊस झाला. यामध्ये हिंगोली तालुक्यात ३.८ मिमी, कळमनुरीत १.४ मिमी, वसमत २.८ मिमी, औंढा ५.२ मिमी तर सेनगाव ३.६ मिमी अशी पर्जन्याची नोंद झाली आहे.
मंडळनिहाय असे पर्जन्य
मंडळनिहाय हिंगोली ६.३ मिमी, नर्सी ७, सिरसम २.८, बासंबा २.३, डिग्रस कऱ्हाळे ३, माळहिवरा २.३, खांबाळा ३, कळमनुरी ३, वाकोडी १.५, नांदापूर १.४, डोंगरकडा १.४, वारंगा १, वसमत ३, हयातनगर ३.८, गिरगाव ३, हट्टा १.५, टेंभुर्णी २.८, कुरुंदा ६.८, औंढा ४, येहळेगाव ८.३, साळणा १.३, जवळा ७, सेनगाव २.५, गोरेगाव ३.३, आजेगाव १, साखरा १०, पानकनेरगाव १, हत्ता ३.८ मिमी अशी नोंद झाली आहे. तर आखाडा बाळापूर व आंबा या दोन मंडळांत पर्जन्य झाले नाही.