संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेवेमुळे मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. पूर्वी डायलिसिस करण्यासाठी पर जिल्ह्यात धाव घ्यावी लागत होती. यामध्ये रुग्णही दगावण्याची शक्यता होती. मात्र आता जिल्ह्यातच ही सेवा उपलब्ध झाल्याने वर्षभरात २८७१ रूग्णांना जीवदान मिळाले आहे.मूत्रपिंडाचे आजार बऱ्याच जणांना असतात वेळीच डॉक्टराचा सल्ला घेतला नाही तर या आजारात वाढ होऊन शरीरातील क्षार, पाणी याचा समतोल कामय राहत नाही. तसेच शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. विशेष म्हणजे शरीरात महत्वाचे असलेले दोन्हीह मुत्र पिंडे निकामी झाली तर युरीयाचे शरीरातील प्रमाण वाढते. वेळीच उपचार न केल्यास रुग्ण कोमात जाऊन त्याचा मृत्यूही होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अशा रुग्णांचे डायलिसिस करणे खूप गरजेचे असते. यामध्ये रुग्णाच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ काढले जातात. पाच वर्षापुर्वी हि सुविधा हिंगोली येथे नसल्याने डायलिसिसच्या रुग्णांना औरंगाबाद, नांदेड येथे धाव घ्यावी लागत होती. ही बाब खूप खर्चिक तर होतीच; मात्र ये- जा च्या धावपळीत रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. परंतु सन २०१४ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सुविधा सुरु केली होती. पहिल्या वर्षी केवळ ८१२ रुग्णांनी लाभ घेतला. तर दुसºया वर्षी मात्र रुग्ण संख्येत वाढ झाली. सन २०१५ मध्ये १ हजार ६५९ तर २०१६ मध्ये १ हजार ५४६ आणि २०१७ मध्ये २ हजार ११४, तर २०१८ मध्ये २ हजार ८७१ रुग्णांसाठी ही सेवा खरोखर संजीवनीच ठरली आहे. खाजगी रुग्णालयात डायलिसिस करण्यासाठी एका वेळेला साधरणत: २ हजार ८०० ते ३ हजार रुपयापर्यंत पैसे मोजावे लागतात. मात्र ही सेवा जिल्हा सामान्य रुग्णालयात नि:शुल्क उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांची आर्थिक बचत तर होतच आहे. मुख्य म्हणजे बाहेर जिल्ह्यात घ्यावी लागणारी धाव बंद झाली आहे. डायलेसिस विभागात दोन शिप्ट मध्ये ८ रुग्णांचे डायलिसिस केले जाते. मात्र या ठिकाणी वर्षभरापासून औषधीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचे डायलिसिस करण्यासाठी नियमित कधी औषध तर कधी साहित्य मागत फिरण्याची वेळ येथे कार्यरत असलेल्या कर्मचाºयांवर येत आहे. नव्याने रुजू झालेल्या शल्यचिकित्सकांनी या विभागातील संपूर्ण औषधीचा व साहित्याचा आढावा घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याची शक्यता असल्याचे या विभागातील कर्मचाºयांनी सांगितले.तसेच जिल्हासामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम पुर्ण झाल्यानंतर हा विभाग हलविण्यात जाणार होता.मात्र अजूनही विभाग जागच्या जागीच असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शल्यचिकित्सक यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष दिल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याच बरोबर या विभागात डॉक्टरांचा असलेला अभाव भरुन काढल्यास रुग्ण संख्येत वाढ होऊन मदतही मिळणे शक्य होणार आहे.दर तीन ते चार दिवसाआड केले जाते डायलिसिसडायलिसिस सुरु असलेल्या रुग्णांचे तीन ते चार दिवसात जवळपास चार ते साडेचार किलो वजन वाढते. त्यामुळे त्याला डायलिसिस करणे गरजेचे असते. एका - एका रुग्णाला चार ते साडेचार तास डायलिसिस करण्यासाठी लागतो. डायलिसिस झाल्यानंतर रुग्णांचे वजन कमी होऊन रुग्ण स्वत: पायाने चालत जातो. विशेष म्हणजे या विभागातील सर्वच टिम सतर्क राहत असल्याने रूग्णांची गैरसोय होऊ दिली जात नाही. येथे हिंगोली शहरातील जिजामाता नगरातील किसन बोरकर यांचे ५०० वेळा डायलिसिस झाले आहेत. तर सलीम पठाण यांचे ५२३ वेळा जवळपास एक- एक रुग्ण डायलिसिसवर तीन ते साडेतीन वर्ष जिवन जगला आहे. शिवाय या ठिकाणी ‘किडनी ट्रांसप्लांट’ ही करण्यात आलेले असल्याचे विभागाचे इनचार्ज आर. के. बोरा यांनी सांगितले. अजूनही या ठिकाणी सुविधा दिल्या जाऊ शकतात. मात्र उणीव आहे ते या ठिकाणी डॉक्टरांची ती भरुन निघाल्यास सेवेमध्ये अजून भर पडण्यास मदत होऊ शकते.येथील रुग्णालयातील रोजंदारी कामगार कमी करण्यात आल्याने काही प्रमाणात प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. तर रुग्णालय परिसरातील स्वच्छतेसाठी पालिकेकउून कर्मचारी मागविले आहेत.
डायलिसिसमुळे ३ हजार रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 11:16 PM