रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये औंढा परिसरात २० पैकी ३ रुग्ण आढळले. यात सुरवाडी १, माथा १, सुकापूर १, सेनगाव २ पैकी १ रुग्ण केलसुला येथील आहे. कळमनुरी येथे ३ जणांची तपासणी केली असता एकही रुग्ण आढळला नाही. आरटीपीसीआर टेस्टमध्ये हिंगोली परिसरात २५ रुग्ण आढळले. यात हेमराज गल्ली १, विद्यानगर ३, गंगानगर ५, शिवाजीनगर १, नेहरूनगर १, रिसाला बाजार १, जिल्हा रुग्णालय १, विठ्ठल कॉलनी १, जिल्हा परिषद क्वॉर्टर १, श्रीनगर १, बियाणीनगर १, पहेणी १, भिंगी १, सिरसम ३, डिग्रस कऱ्हाळे १, सवड १, इडोळी १, सेनगाव १, वसमत शहरातील देवाशिषनगर १, औंढा येथील कासारगल्ली १, अशा बाधित रुग्णांचा समावेश आहे. २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे १३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
आजपर्यंत एकूण ४ हजार ११५ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ३ हजार ८०४ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला २५१ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन चालू आहे. ३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.