लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली नांदेड या मुख्य रस्त्यावर २७ नोव्हेंबर रोजी येथील पोलिसांनी अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ३२ वाहनांवर कारवाई करुन ५६ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती जी.एस. राहीरे यांनी दिली.शहरात अवैध वाहतूक वाढली होती. या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी दिवसभर कारवाई केली. अवैध प्रवासी वाहतूक करणाºया २६ वाहनावर कारवाई करत प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल केला. तर इतर सहा वाहनांवर कलम २८३ प्रमाणे कारवाई केली. न्यायालयानेही २ वाहनांवर शिक्षेची कारवाई केली. दारुच्या नशेत वाहन चालविणाºया चालकाला दिड हजाराचा दंड न्यायालयाने ठोठावला. या कारवाईमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांनी आज प्रवाशांची वाहतूक केली नाही. ही कारवाई पोनि राहीरे, सूर्यवंशी, नामदेव जाधव, गडदे, नलावार, भगत, थिटे आदींनी केली.अवैध दारूसाठा जप्त; गुन्हा दाखलहिंगोली - पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलीस ठाणे हद्दीत एका ठिकाणी छापा मारून अवैध दारूसाठा जप्त केला. आरोपीकडील ६०० रूपये किंमतीचा अवैध देशी दारूसाठा पोलिसांनी पकडला. याप्रकरणी बबन कांबळे रा. बारेपुरवाडी याच्याविरूद्ध कुरूंदा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसमत तालुका व कुरूंदा परिसरात सर्रासपणे छुप्या पद्धतीने अवैध दारूविक्री होत आहे. अवैध दारूविक्री विरोधात कारवाई करूनही आळा बसत नसल्याचे चित्र आहे.
३२ वाहनांवर कारवाई; ५६ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 1:07 AM