शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

हिंगोलीत ३३ लाखांचा धान्य घोटाळा; तत्कालीन तहसीलदारांसह २० जणांवर गुन्हा दाखल

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 29, 2023 11:35 AM

हिंगोली तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीत ऑफलाईन धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अतिरिक्ति धान्याचे वाटप झाल्याचे समोर आले होते.

हिंगोली : जानेवारी ते जुलै २०१९ या काळात ऑफलाईन धान्य वाटप व अतिरिक्त धान्य वाटपामध्ये अनियमितता झाल्याचे उघड झाले होते.यातील ३३ लाख रूपयांची वसुलपात्र रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या हिंगोली तहसीलच्या तत्कालीन तहसीलदारांसह २० जणांविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नांद झाला.

हिंगोली तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीत ऑफलाईन धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अतिरिक्ति धान्याचे वाटप झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुरवठा विभागाने  नोटीस देऊन अतिरिक्त वाटप झालेल्या धान्याची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही जणांनी धान्याची रक्कम भरणा केली.मात्र, यामध्ये ३३ लाख रुपयांची वसुलपात्र रक्कम भरण्यात आली नव्हती. याप्रकरणी बुधवारी पहाटे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात २० जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला. 

तत्कालीन तहसीलदारांसह २० जणांचा समावेशजानेवारी ते जुलै २०१९ या काळात ऑफलाईन धान्य वाटप व अतिरिक्त धान्य वाटपामध्ये अनियमितता करून फसवणूक केल्याप्रकरणी हिंगोली तहसीलचे परिविक्षाधिन तहसीलदार हिमालय घोरपडे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे, तत्कालीन अव्वल कारकून कैलास वाघमारे, तत्कालीन गोदामपाल इम्रान पठाण, तत्कालीन अव्वल कारकून बी.बी. खडसे, रास्तभाव दुकानदार रेखा प्रकाश पाईकराव (माळसेलू), पी.आर. गरड (राहोली), ज्ञानेश्वर रामराव मस्के (सिरसम बु.), विनोद लक्ष्मण आडे (पेडगाव १), हिंगोली तालुका विक्री संघ क्र. १ चे चालक, रास्तभाव दुकानदार एस.के. चव्हाण (पळसोना), डी.एम. शिंदे (सावरगाव बं), मिलिंद निवृत्ती पडघन (जुमडा म.), गणाजी मुकिंदा बेले (खेर्डावाडी), अनुसया अंबादास गाडे (वैजापूर), गोपाल तापडीया (भिरडा), डी.बी. चव्हाण (हिरडी), डी.बी. चव्हाण (मौजा), गजानन नामदेव गडदे (गाडीबोरी), गोविंदा पुंजाजी मस्के (तिखाडी), पतिंगराव मस्के (वराडी) याचेविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली