लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औरंगाबाद बोर्डाकडून सध्या दहावी व बारावीची परीक्षा घेतली जात आहे. कॉपीमुक्ती आता नावालाच उरली आहे. कुठे बाहेरच जत्रा आहे. तर कुठे आतमध्ये धिंगाणा चाललाय. शिक्षण विभागही हा प्रकार पाहून अवाक झाला. बारावीच्या ४२ तर दहावीच्या चौघांना कॉपी करताना पकडल्याने कॉपीमुक्तीचे बिंग फुटले आहे. इंग्रजी विषयाच्या पेपरला ५ मार्च रोजी अनेक केंद्रांवर कॉपीचे प्रकार दिसून आले.औरंगाबाद बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात कापीमुक्त अभियान राबविले जात असल्याचा डंका पिटविला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र परीक्षा केंद्राबाहेरील मंडळी वर्गखोलीतील विद्यार्थ्यांना सर्रासपणे नकला पुरवित असल्याचे ‘लोकमत’ ने ५ मार्च रोजी केलेल्या स्टिंगमध्ये उघडकीस आले. हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रास दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास भेट देऊन पाहणी केली असता यावेळी अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत असल्याचे दिसून आले. येथे दोन ठिकाणी परीक्षा घेतली जात आहे. यावेळी पर्यवेक्षण शिक्षक विद्यार्थ्यांच्या हालचालीवर करडी नजर ठेऊन होते. परंतु शिक्षकांचे लक्ष विचलित होताच केंद्राबाहेरून परीक्षा हॉलमध्ये कॉप्या काही जण फेकत असल्याचे दिसून आले. येथे एकच पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसून आला. परीक्षा केंद्राबाहेर फिरकणाऱ्यांना पोलीस कर्मचारी दम देत होते. परंतु काही मिनिटांतच परत बाहेरील मंडळी कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्राच्या पाठीमागून गर्दी करीत होते. नकला पुरविणाºयांना आवरताना एकाच कर्मचाºयाच्या नाकीनऊ येत होते. माळहिवरा, वडद व खंडाळा येथील विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा खंडाळा येथे घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्र क्रमांक ५०५७ मध्ये २२३ विद्यार्थी इंग्रजी विषयाच्या पेपर देणार असल्याचे केंद्राबाहेरील फलकावर माहिती डकविली होती. परीक्षा केंद्र परिसरात शांततामय वातावरण असले तरी, केंद्राच्या पाठीमागून नकला देणाºयांची जत्रा होती. विशेष म्हणजे परीक्षा केंद्राच्या पाठीमागील गर्दीच्या गोंगाटामुळे पर्यवेक्षण करणाºयांनाही त्रास सहन करावा लागला. बैठे पथक व पोलीस कर्मचारी अधून-मधून केंद्राच्या पाठीमागे चकरा मारत होते. त्यांना हुसकावतही होते. परंतु तरूण मंडळी मात्र कोणाचेही ऐकण्यास तयार नसल्याचे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये मंगळवारी दिसून आले. परीक्षा केंद्रास दुपारी १ वाजेपर्यंत भरारी पथकातील एकाही अधिकाºयाने भेट दिली नव्हती. जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रावरून दहावीची परीक्षा घेण्यात येत असून यासाठी भरारी व बैठ्या पथकांची नियुक्ती केली आहे. शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकाºयांच्या पथकाने जिल्ह्यातील केंद्रांना भेट दिली.जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रावरून ५ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला. यासाठी जिल्ह्यात १६८११ पैकी १६ हजार ४७८ जणांनी दहावीची परीक्षा दिली. तर ३३३ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर होते. सेनगाव तालुक्यातील रुक्मिणी विद्यालय पळशी या केंद्रास शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी एका विद्यार्थ्यास कॉपी करताना पकडले.५0 पेक्षा जास्त कॉपीबहाद्दर पकडलेजिल्ह्यात दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान पाटील महा.माळहिवरा-७, शिवराम मोघे सैनिकी कळमनुरी ७, बहिर्जी स्मारक गिरगाव ८, केंब्रिज वसमत ४, अन्नपूर्णा आरळ ३, नरहर कुरुंदकर कुरुंदा ८, नागनाथ विद्यालय औंढा ३, आडगाव मुटकुळे ५, मधोमती लाख ४ व जामगव्हाण येथे एकास कॉपी करताना पकडल्याचे सूत्रांनी सांगितले.परीक्षा केंद्राबाहेर पालकांची जत्रा; नकला पुरविताना पालकांची दमछाक’सेनगाव : तालुक्यात आठ परीक्षा केंद्रामध्ये दहावीची परीक्षा होत आहे. मंगळवारी इंग्रजी विषयाच्या पेपर होता. यावेळी सेनगाव येथील जि.प.शाळेच्या परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठी गर्दी होती. काही पालक पळापळ करीत नकला पुरविण्याचा उद्योग करीत असल्याचे चित्रही पहावयास मिळाले. सेनगाव तालुक्यात गतवर्षी दहावीच्या परीक्षा केंद्राचा गोंधळ चांगलाच गाजला होता. पासिंग रॅकेटच्या माध्यमातून परजिल्ह्यातील ७०० विद्यार्थी सेनगाव तालुक्यात प्रवेशित झाल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे या वर्षी दहावीच्या परीक्षेकरिता शिक्षण विभाग प्रभावी नियोजन करील, कॉपीमुक्तीसाठी गंभीर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर कॉपीला आळा घालण्याचा अनुषंगाने प्रभावी उपाययोजना केल्या नसल्यामुळे कॉपीमुक्तीचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यातील बंहुताश परीक्षा केंद्रामध्ये मोकळ्या वातावरणात बिनधास्त कॉपी चालू आहे. याची पडताळणी करण्यासाठी नियुक्त कर्मचारी कारवाईचा धाक दाखवित नसल्याने हा प्रकार यावर्षी वाढला आहे. परीक्षा केंद्रामध्ये बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश निषेध असल्याने संबधितांना रान मोकळे झाले आहे. मग्ांळवारी इंग्रजी विषयाच्या पेपरला सेनगाव येथील जि.प.प्रशालेच्या परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठी गर्दी होती. काही पालक नकलांचा पुरवठा करीत असल्याने पोलीस व पालकांच्या पळापळीचे चित्र पहावयास मिळाले. या प्रकाराकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.गोरेगाव येथे दहावीच्या परीक्षा सुरळीतगोरेगाव : येथील जिल्हा परिषद प्रशाला हे इयत्ता दहावी परीक्षेचे कॉपीमुक्त परीक्षा केंद्र म्हणून ओळखले जाते. यंदाही परंपरा कायम राखल्याचे चित्र ५ मार्च रोजी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनात दिसून आले. यावेळी मोजका पोलीस बंदोबस्त असतानाही परीक्षा केंद्राबाहेर इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी एकूण ४०४ विद्यार्थ्यांपैकी ३९८ विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक एस.एस. गिरी यांनी दिली. एकूण १६ वर्गखोल्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी बाकाचा व्यवस्था करून परीक्षा व्यवस्थापनाकडून एकंदरीत कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळाले.वसमतला कॉपीमुक्त वातावरणवसमत : दहावीच्या परीक्षा वसमतमध्ये कॉपीमुक्त वातावरणात पार पडत आहे. केंद्रावर असलेले बैठे पथक, भरारी पथक, पोलीस बंदोबस्त यामुळे कॉपीला आळा बसला आहे. परीक्षा केंद्राजवळ ही शुकशुकाटच पहावयास मिळाला. वसमत तालुक्यात दहावीची १२ तर, बारावीची ९ केंदे्र आहेत. मंगळवारी इंग्रजीचा पेपर होता. तालुक्यात एकूण ३ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात मराठी माध्यमाचे ३ हजार ६५६, उर्दू माध्यमाचे २१० तर इंग्रजी माध्यमाचे २९ विद्यार्थी सहभागी होते. मंगळवारी शहरातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या असता सर्वच परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तर बाहेर शुकशुकाट होता. केंद्रात बैठे पथक तैनात होते. तपासणी करूनच आत सोडले जात होते. पेपरचा पॅटर्न बदलल्याने व वस्तुनिष्ठ प्रश्न असल्यानेही विद्यार्थ्यांना कॉपी करणे अवघड होते.
३३३ विद्यार्थी गैरहजर; कॉपीबहाद्दरास पकडले परीक्षा केंद्राबाहेर नकला पुरविणाऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:45 AM