- इस्माईल जाहागिरदारवसमत (जि. हिंगोली): येथील कृऊबा बाजार समिती मोंढ्यात हळद उच्चांकी गाठत आहे. मोंढ्यात बुधवारी ८ हजार कट्ट्यांची आवक झाली. बोली बिटात ११ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत हळदीला दर मिळाला. बिटात दोन दिवसांपासून हळदीच्या दराने उच्चांकी घेतली आहे. मंगळवारी ३० हजार १०० रुपयांवर हळद गेली होती. दुसऱ्या दिवशी तर सर्वाधिक ३५ हजारांचा दर मिळाला आहे. सर्वसाधारण हळदीलाही १३ हजार ते २८ हजारा पर्यंत दर मिळाला आहे. दररोज हळदीत तेजी येत असल्याने व्यापारी व शेतकरी चक्रावून जात आहेत.
वसमतच्या मोंढ्यात ८ ऑगस्ट रोजी हळदीच्या ७ हजार कट्ट्यांची आवक झाली होती. तर बिटात हळदीस ३० हजार १०० रुपयांचा दर मिळाला होता. ९ ऑगस्ट रोजी मोंढ्यात हळदीच्या ८ हजार कट्ट्यांची आवक झाली. बोली बिट झाले तेंव्हा बिटात हळदीस ११ हजार ते २८ हजार रुपयांचा दर मिळाला. शेतकरी माधवराव पतंगे (रा. खांडेगाव) यांच्या दर्जेदार हळदीच्या ८ कट्ट्याला ३५ हजारा दर मिळाला. दिवसागणिक हळदीचे दर वाढत आहेत. हळदीचे दर दररोज वाढत असल्याने शेतकरी व व्यापारी सुध्दा चक्रावून गेले आहेत.
३५ हजार प्रति क्विंटलचा दर...कृऊबा समीती मोंढ्यात दर्जेदार हळदीस वाढते दर पाहता मी पण दर्जेदार ८ कट्टे बिटात टाकले होते. हळद चांगली होती. विचार न करणारा एवढा ३५ हजाराचा दर मिळाला. ज्यांचेकडे हळद शिल्लक आहे त्यांच्यासाठी चांगले दिवस म्हणावे लागेल.- माधवराव पतंगे, रा खांडेगाव, शेतकरी