लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अखेर जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना ६ डिसेंबर रोजी मंजूर मिळाली असून उद्यापासून वसतिगृह सुरू होणार आहेत. मागील आठ दिवसांपासून हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावांची पडताळणी सुरू होती. मात्र सर्वच प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यातील अनेकांनी त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून अशा ३७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे २५४५ विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्ह्यातून अनेक कुटूंब जिल्हाबाहेर कामाच्या शोधात गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु प्रस्तावातील त्रुटींमुळे वसतिगृह मंजुरीची प्रक्रिया रखडलेली होती. मात्र अटी व शर्तीच्या आधिन राहून त्रुट्यांची पूर्तता करणाºयांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबातील पाल्यांना लाभ मिळणार आहे. वसतिगृहात अनुचित प्रकार घडल्यास किंवा अनियमितता आढळल्यास शालेय व्यवस्थापन समितीला जबाबदार धरले जाईल, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी देवीदास इंगोले यांनी दिली.तसेच पालक स्थलांतरित न होता विद्यार्थी जर वसतिगृहाचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यास मुख्याध्यापक व समितीला जबाबदार धरले जाईल. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, बायमॅट्रीक प्रणालीवर बंधनकारक करण्यात आले असून यामध्ये दोष आढळल्यास विद्यार्थ्यांचा खर्च दिल्या जाणार नाही. तसेच संबंदितांना आधार लिकिंकची माहिती सर्व शिक्षा विभागाकडे देणे बंधनकारक केले आहे. बायोमेट्रिक उपस्थितीच ग्राह्य धरली जाणार आहे.यंदा दिवाळीनंतर आठ दिवसांतच कारखाने सुरू झाले होते. त्यामुळे अनेकांचे पाल्य स्थलांतरित झाले आहेत. हंगामी वसतिगृहांना झालेल्या विलंबानंतरही अडीच हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:09 AM
अखेर जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना ६ डिसेंबर रोजी मंजूर मिळाली असून उद्यापासून वसतिगृह सुरू होणार आहेत. मागील आठ दिवसांपासून हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावांची पडताळणी सुरू होती. मात्र सर्वच प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यातील अनेकांनी त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून अशा ३७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे २५४५ विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.
ठळक मुद्देत्रुटींची पूर्तता : २५४५ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ, यंदा झाला विलंब