आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात जांभरुण तांडा १, जिजामातानगर २, सावळी तांडा १, बोरी सावंत १, जवळा बु. १, आनंदनगर १, शिंदेफळ १, देवाळा २, पळशी १, सरस्वतीनगर १, पेन्शनपुरा १, सिनगी १, हिलटॉप कॉलनी २, रिसाला बाजार १, तळणी १, विद्यानगर १, एसआरपी कॅम्प १, माळहिवरा १, सावरखेडा १, अष्टविनायक नगर १, वाशिम १, हिवरा बेल १, मस्तानशहा नगर १, माळसेलू १, मंगळवारा २, सुरेगाव १, तलाबकट्टा १, आनंदनगर १, देवगल्ली १, भानखेडा १, हिंगणी १, तिरुपतीनगर १, दाटेगाव १, कंजारा १, वंजारवाडा १, डिग्रस कऱ्हाळे १, नर्सी फाटा १, नारायणनगर ३, गोविंदनगर १, नर्सी नामदेव १, टाले हॉल १ असे ४७ रुग्ण आढळले. औंढा परिसरात औंढा ३, टाकळखोपा १, अंजनवाडा १ असे ५ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात डोंगरकडा १२, जवळा पांचाळ २, भाटेगाव २, वडगाव ४, वारंगा फाटा २, सुकळी वीर १, देवजना १, कांडली २, बाळापूर ३, येहळेगाव १, बेलथर १, हदगाव १, येलकी २, आडा १ असे ३५ रुग्ण आढळले. बरे झाल्याने आज २०४ रुग्णांना घरी सोडले. यात जिल्हा सामान्य रुग्णालय ३०, लिंबाळा ३५, वसमत ५४, कळमनुरी ४७, सेनगाव २२ तर औंढा येथून १६ सोडले.
चार जणांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला. जवळा बाजार येथील ६९ वर्षीय पुरुष, सावरखेडा येथील ६४ वर्षीय पुरुष, जिजामातानगर येथील ८७ वर्षीय पुरुष, अकोली ता. वसमत येथील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आजपर्यंतचा मृत्यूचा आकडा १६४ वर गेला आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात १०,४७९ रुग्ण आढळले. त्यापैकी ८९८५ बरे झाले. आजघडीला १३३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी गंभीर असलेल्या ३६० जणांना ऑक्सिजनवर ठेवले, तर २२ जण अतिगंभीर असल्याने बायपॅपवर आहेत.