जिल्ह्यात रविवारी सेनगाव परिसरात १९, औंढा परिसरात ८ असे एकूण २७ जणांची रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली होती. यात एकही रुग्ण आढळला नाही. परंतु, आरटीपीसीआर टेस्टमध्ये ४ रुग्ण आढळले आहेत. हिंगोली परिसरात १२४ जणांची तपासणी केली असता टाकळी येथे एक रुग्ण आढळला. त्यानंतर वसमत परिसरात ६६ जणांची तपासणी केली असता बुधवार पेठेत एक रुग्ण तर सेनगाव परिसरात ४१ जणांची तपासणी केली असता सेनगाव व कोळसा येथे प्रत्येकी १ असे एकूण २ रुग्ण आढळले. औंढा परिसरात ५० तसेच कळमनुरी परिसरात २६२ जणांची तपासणी केली असता एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, रविवारी नवीन कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १५ हजार ९५७ रुग्ण आढळले असून त्यापैकी १५ हजार ५५६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला १७ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:19 AM