लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ प्रकारची कामे करण्यासाठी शासनाने दिलेले उद्दिष्ट लाखो कामांचे आहे. मात्र त्यातील ४0६७ कामे मंजूर असूनही ती सुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. तर सुरू असलेल्या कामांची संख्याही अवघी १२0 आहे.मग्रारोहयोचाच भाग म्हणून शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण ही योजना काढली आहे. शेतकºयांना सुलभरीत्या सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी ही स्वतंत्र योजना काढली. मात्र त्यात काही अटींत शिथिलता देणे आवश्यक असताना त्यात कोणताच बदल केला नाही. मग्रारोहयोत ज्या बाबी करणे शक्य होत नव्हते, त्या केवळ योजनेचे नाव बदलल्याने करता येतील, हे गृहित धरणेच मुळात चुकीचे ठरले आहे. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेत २८१५ कामांना प्रशासकीय मंजुरीही दिली. मात्र ७२८ कामेच सुरू झाली. पूर्ण एकही नाही.शेततळे मंजूर ३२२ पैकी एकही सुरू नाही. भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंगची मंजूर ३७३ पैकी ४२ कामे सुरू आहेत. नोडपची मंजूर ४५८ पैकी एकही नाही. फळबाग लागवड ३४६ पैकी ७३, शौचालयाची २२६ पैकी ११९, शोषखड्ड्यांची ८८१ पैकी ४८५, रोपवाटिकेची ३0 पैकी २२ वृक्षलागवडीची २२ पैकी १७ तर ग्रामयोजनेत १२८ पैकी १२0 कामे सुरू आहेत.
४0६७ कामे मंजुरीनंतर ठप्प !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 11:49 PM
जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ प्रकारची कामे करण्यासाठी शासनाने दिलेले उद्दिष्ट लाखो कामांचे आहे. मात्र त्यातील ४0६७ कामे मंजूर असूनही ती सुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. तर सुरू असलेल्या कामांची संख्याही अवघी १२0 आहे.
ठळक मुद्देहिंगोली : समृद्ध महाराष्ट्र जनकल्याणचे चित्र